AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचं ठरलं? महायुतीला बसणार मोठा हादरा, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली असून, महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचं ठरलं? महायुतीला बसणार मोठा हादरा, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2025 | 2:52 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये.

एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. काही जागा अपवाद असू शकतील तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीच असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्य निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत लढणार का? यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नगर परिषदेच्या निवडणुका या स्थानिक स्थरावरच्या असतात. ही निवडणूक लढवण्यासाठी  अनेक कार्यकर्ते हे इच्छुक असतात. त्यामुळे मोठ्या निवडणुकीमध्ये महायुती शक्य आहे, मात्र या छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावनात लक्षात घेऊन  निवडणुका स्वतंत्र लढलेल्या बऱ्या त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट एकला चलो रे चा नारा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी कशी लढवणार याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यातच राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू  मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा  देखील सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीसंदर्भातील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या