AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर दिलजमाई, शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र लढणार, पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, नवीन राजकीय समिकरण तयार झाल्याचं पहायला मिळत आहे, अखेर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची दिलजमाई झाली आहे.

मोठी बातमी! अखेर दिलजमाई, शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र लढणार, पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2025 | 2:49 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती काही ठिकाणी युतीमध्ये ही निवडणूक लढवणार आहे, तर काही ठिकाणी तीनही घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता एक नव राजकीय समिकरण समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती, या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युतीची तयारी दर्शवण्यात आली होती, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, हा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर आता या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे.

कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायतीसाठी एक नवं समिकरण समोर येत आहे, चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे, माजी आमदार राजेश पाटील, आणि नंदाताई बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत,  मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढवण्यात येणार आहे. चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, दरम्यन जशी चंदगडमध्ये युती झाली तशी राज्यात अजूनही काही ठिकाणी युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान दुसरीकडे रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे ओबीसीसाठी जागा आरक्षित आहेत, तिथे जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच संधी द्या, जिथे ओबीसी उमेदवार मिळणार नाहीत, तिथे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना उमेदवारी द्या, अशा सूचना शरद पवार यांनी या बैठकीमध्ये खासदार, आमदार यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...