AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत मोठी खांदेपालट, पार्थ आणि जय पवारांकडे मोठी जबाबदारी, पण प्रफुल्ल पटेलांचे नावच नाही, सुनेत्रा पवार म्हणाल्या ती यादी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून प्रफुल्ल पटेलांचे नाव यादीतून वगळले गेले आहे, तर जय पवारांची नवी नियुक्ती झाली आहे. ही तांत्रिक चूक असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीत मोठी खांदेपालट, पार्थ आणि जय पवारांकडे मोठी जबाबदारी, पण प्रफुल्ल पटेलांचे नावच नाही, सुनेत्रा पवार म्हणाल्या ती यादी...
sunetra pawar praful patel
| Updated on: May 12, 2026 | 8:32 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निधन होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खांदेपालट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या यादीतून पक्षाचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

नेमके बदल काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासोबतच अजित पवारांच्या दोन्ही पूत्रांना बढती देण्यात आली आहे. पार्थ पवार यांची नॅशनल जनरल सेक्रेटरी (राष्ट्रीय सरचिटणीस) म्हणून निवड करण्यात आली आहे. तर त्यांचे धाकटे बंधू जय पवार यांची ‘नॅशनल सेक्रेटरी’ (राष्ट्रीय सचिव) पदी वर्णी लागली आहे.

मात्र या यादीत अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी होती.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

या यादीवरून चर्चा सुरू होताच अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जी यादी फिरत आहे, त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्यामध्ये लवकरच सुधारणा करण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. या संदर्भात २९ तारखेलाच निवडणूक आयोगाला पत्र दिले असून ही चूक दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.

पक्षांतर्गत चर्चांना उधाण

दरम्यान प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अत्यंत विश्वासू आणि अनुभवी नेते मानले जातात. अशा वेळी त्यांचे नाव या यादीतून गायब असणे ही केवळ तांत्रिक चूक आहे की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत, याबाबत चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे जय पवार आणि पार्थ पवारांच्या नियुक्तीमुळे आता पक्ष राष्ट्रीय पातळीवरील तरुणांचा समावेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Follow Us
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?