AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांवर संताप, शरद पवार गटाची सर्वात पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजांवर संताप व्यक्त केला. या सुनावणीनंतर शरद पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांवर संताप, शरद पवार गटाची सर्वात पहिली प्रतिक्रिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 17, 2023 | 5:55 PM
Share

नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2023 : सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजांवर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याचिकांच्या सुनावणीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख दिलीय. विधानसभा अध्यक्षांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यासाठी ही शेवटची संधी आहे, असं कोर्टाने स्पष्ट बजावलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त केली. दसऱ्याच्या सुट्टीत अध्यक्षांसोबत बसा आणि वेळापत्रक ठरवा, अशा सूचना कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आजच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात गेले होते. सुनावणी पार पडल्यानंतर दोन्ही नेत्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कोर्टात काय-काय घडलं याविषयी माहिती दिली.

सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

  • सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजांवर संताप व्यक्त केला
  • विधानसभा अध्यक्षांनी 11 मे पासून काहीही केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल.
  • तुम्ही मीडियाला मुलाखती देत आहात, पण वेळापत्रकाचा निर्णय घेत नाहीत.
  • तुम्ही निर्णय घेतल नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.
  • याचिका निवडणूक आयोगासमोर नव्हे तर अध्यक्षांसमोर आहे.
  • आतापर्यंत झालेले छोटे-मोठे निर्णय सांगू नका, तुम्ही वेळापत्रक द्या.
  • तुमच्यासाठी 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी आहे. त्यादिवशी वेळापत्रक घेऊन या.

‘अजित पवार गटाचं काय म्हणणं आहे ते महत्त्वाचं नाही’

दरम्यान, “अजित पवार गटाचं काय म्हणणं आहे ते महत्त्वाचं नाहीय. कोर्टाचं काय म्हणणं आहे ते महत्त्वाचं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचे प्रकरण एकत्रित केले आहेत. त्याचे कागदपत्रे तुम्ही सर्वांना पाहिले आहेत’, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘यांचं नशीब चांगलं की तिथे…’, जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“कोर्ट नाराजी व्यक्त करत होतं. कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मुलाखतीवर नाराजी व्यक्त केली. राहुल नार्वेकर बाहेर जावून सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांबद्दल बोलत आहेत याबद्दल कोर्टाने स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय. एकवेळ अशी आली होती की, आम्ही आता आम्हीच तुम्हाला वेळापत्रक देतो. यांचं नशीब चांगलं की तिथे तुषार मेहता उभे होते. त्यांनी कसंबसं वेळ सावरुन नेली आणि 30 तारखेपर्यंत वेळ मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“एक स्पष्ट झालंय, कोर्ट अध्यक्षांच्या कामकाजावर प्रचंड नाराज आहे. लोकसभेच्या निवडणुकांआधी यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. कोर्टाने शेवटची संधी दिलीय. सुप्रीम कोर्टाचे आदेश विधानसभा अध्यक्ष मानणार नसतील तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला लक्ष घालावं लागेल. मला वाटतं सुप्रीम कोर्ट 30 तारखेला निर्णय घेईल”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?