भास्कर जाधवांचंही ठरलं, माजी प्रदेशाध्यक्षच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार

गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका जाहीर केली. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावप्रमुख, वाडी प्रमुख आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

भास्कर जाधवांचंही ठरलं, माजी प्रदेशाध्यक्षच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात मोठा धक्का बसणं निश्चित झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav NCP) येत्या दोन दिवसात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी (Bhaskar Jadhav NCP) ही भूमिका जाहीर केली. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावप्रमुख, वाडी प्रमुख आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

भास्कर जाधव यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपात जाणार नसल्याचा उल्लेख केला. त्यामुळे भास्कर जाधव शिवसेनेत जाणार हे मात्र निश्चित झालं आहे. याच वेळेला आपण पक्षांतर करत असताना जे कार्यकर्ते आपल्या सोबत येतील, त्यांना आपण घेऊन जाणार आणि जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल आपली नाराजी नसेल, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीला कोकणात पुन्हा एकदा सर्वात मोठं भगदाड पडणार असल्याचं निश्चित झालंय.

कोण आहेत भास्कर जाधव?

1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. 1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवली. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.

2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.

आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *