Video | “आजही देवाकडे जास्त न बघता आईकडे बघतो,” मातेची आठवण येताच राज्यातील मोठा मंत्री गहिवरला

| Updated on: May 15, 2021 | 9:04 PM

आईबद्दल सांगताना जलसंपदामंत्री जयंत पाटील भावूक झाले आहेत. (jayant patil mother kusum patil video)

Video | आजही देवाकडे जास्त न बघता आईकडे बघतो, मातेची आठवण येताच राज्यातील मोठा मंत्री गहिवरला
jayant patil mother kusum patil
Follow us on

मुंबई : आई या दोन शब्दांमध्ये मोठी शक्ती आहे. आईने लेकरांवर केलेले संस्कार, त्यासाठी घेतलेले कष्ट याला कुठेही तोड नाही. या जगात जेवढ्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत, त्यांच्या परिश्रमांना आईच्या मार्गदर्शनाची जोड ही असतेच. महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आईबाबतही असंच काहीसं आहे. आईबद्दल सांगताना जयंत पाटील (Jayant Patil) भावनिक झाले आहेत. त्यांनी “मी आजही देवाकडे जास्त न पाहता, माझ्या आईकडेच पाहतो,” अशा भावनिक शब्दांत आईचे महत्त्व सांगितले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये ते आपल्या आईबद्दल भरभरून बोलताना दिसतायत. (NCP leader Jayant Patil became emotional while remembering his mother Kusum Patil see video)

जयंत पाटील यांच्या आईचे 2017 साली निधन

जयंत पाटील यांच्या आई कुसुम राजाराम पाटील (Kusum Patil)  यांचा जन्म 1922 साली झाला होता. त्यानंतर त्यांचे निधन 29 डिसेंबर 2017 रोजी निधन झाले. जयंत पाटलांच्या आईचे निधन होऊन आज चार वर्षे झाली आहेत. मात्र, आजही जयंत पाटलांच्या मनात त्यांच्या आईबद्दलच्या भावना ताज्या आहेत. आजही ते त्यांच्या आईच्या आठवणी सांगतात. त्यांच्या आईने केलेले संस्कार, दिलेले धडे ते आजही विसरलेले नाहीयेत. आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांना त्यांच्या आईची आठवण आली आहे. आई कुसुम यांनी दिलेले धडे जयंत पाटील आजसुद्धा विसरले नाहीयेत.

“देवापेक्षा मी आईकडे जास्त पाहतो”

जयंत पाटलांनी आपल्या आईविषयी सांगताना इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “मला माझी आई ही देवासमान होती. तिच्या बोलण्यात वागण्यात साधेपणा आणि आपुलकी होती. चुकीचं काहीही करायचं नाही हे आम्ही तिच्याकडून शिकलो. बापू सतत महाराष्ट्रभर फिरतीला असायचे. त्यामुळे आईचेच संस्कार आमच्यावर आहेत. आईसाठी मी कधीही कुठलीही तडजोड केली नाही. आजही मी देवाकडे जास्त पाहत नाही, मी माझ्या आईकडे जास्त पाहतो,” असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी आपल्या आईबद्दल सांगताना काढले आहेत.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, 9 मे रोजी मदर्स डे होऊन गेला. या दिवशी अनेकांनी आपल्या आईचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत कृतज्ञता व्यक्त केली. कितीजरी यशाची शिखरं गाठली तरी, आपल्या आई-वडिलांना कधीच विसरु नये, असे अनेकवेळा सांगितले जाते. मात्र, त्याचे मूर्तीमंत उदाहरण हे जयंत पाटील आहेत. जयंत पाटील आजसुद्धा त्यांच्या आईची रोज आठवण काढतात. त्यांच्या आईला त्यांनी देवाबरोबरीचे स्थान दिले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

इतर बातम्या :

वडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची ‘राज’नीती!