AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची ‘राज’नीती!

राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. (know everything about jayant patil's Political Career)

वडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची 'राज'नीती!
jayant patil
| Updated on: May 14, 2021 | 7:19 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. प्रचंड अभ्यासू, प्रश्नांची जाण असलेले नेते, हजरजबाबी आणि एखाद्याची हसता हसता फिरकी घेणारे नेते म्हणूनही जयंत पाटील यांची ख्याती आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे ते चिरंजीव असले तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा… (know everything about jayant patil’s Political Career)

घरातच राजकारणाचं बाळकडू

इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे जयंत पाटील यांचं गाव. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1962 रोजी झाला. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. वडिलांकडूनच राजकारणाचे धडे मिळाले. सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ग्रामविकास मंत्री आणि गृहमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कामगिरी बजावली आहे.

वडिलांच्या निधनानंतर राजकारणात

लोकनेते राजाराम बापू पाटील हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. त्यांनी 1962 पासून 1970 पर्यंत आणि 1978 मध्ये राज्यात मंत्रीपद भूषविलेलं आहे. 1984मध्ये राजाराम बापू पाटील यांचं आकस्मिक निधन झालं. त्यामुळे जयंत पाटील यांना तातडीने अमेरिकेतून भारतात यावं लागलं. ते अमेरिकेच्या न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होते. मायदेशी आल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. इस्लामपूर वळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी 1990 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते 60 हजारांच्या मताधिक्याने निवडून येत आहेत. 1999 ते 2008 पर्यंत ते राज्याचे अर्थमंत्री होते. 2014 पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकास मंत्री होते. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये जलसंपदा मंत्री आहेत.

पवारांचे सर्वाधिक विश्वासू

जयंत पाटली हे इस्लामपूरचे आमदार आहेत. ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 2008मध्ये आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 2019मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. या पदासाठी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, पवारांनी जयंत पाटील यांच्या नावाला पसंती दिली.

पवार कुटुंबाशी घनिष्ट

जयंत पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेच. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचा चांगला समन्वय आहे. राष्ट्रवादीत ते अजितदादांच्या बरोबरीचे नेते म्हणूनही ओळखले जातात.

परिवार संवाद यात्रा’

जानेवारी 2021मध्ये जयंत पाटील यांनी राज्यभर ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ सुरू केली होती. त्यांनी या यात्रेच्या निमित्ताने 17 दिवस तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी विदर्भ व खान्देशातील 14 जिल्हे, 82 मतदारसंघाचा आढावा घेतला. शिवाय कार्यकर्त्यांच्या 135 बैठका व 10 जाहीर सभा घेतल्या. या निमित्ताने तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटना बळकटीवर त्यांनी भर दिला होता. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा चेहरा बदलण्याचं कामही त्यांनी केलं.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं

जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिली नाही. त्यांनी मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं असं जाहीर बोलून खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं होतं. (know everything about jayant patil’s Political Career)

जयंत पाटील यांची वैयक्तिक माहिती

नाव : जयंत राजाराम पाटील जिल्हा : सांगली पक्ष – राष्ट्रवादी वय – 59 वर्षे शिक्षण – बी.ई.सिव्हिल इंजिनिअरिंग कुटुंब – पत्नी आणि दोन मुले (know everything about jayant patil’s Political Career)

संबंधित बातम्या:

बालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच!

राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!

उदयनराजेंशी अबोला, गोरेंशी पंगा; निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का?

(know everything about jayant patil’s Political Career)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.