‘खूप विचार-विनिमय करुन सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून निवड’, प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य

"इच्छा असणं काही चुकीचं नाही. आमचे छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी काहीही सूचना केली. सगळ्यांनी बसून एकमताने निर्णय घेतला. भुजबळ काय बोलले ते मी देखील बघितलं. त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही", असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

'खूप विचार-विनिमय करुन सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून निवड', प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 4:12 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. “मला मिळालेल्या संधीचं सोनं करेन”, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीचे नेते गैरहजर होते. शिवसेना, भाजपचा एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे मंत्रालयात याबाबत चर्चा सुरु झाल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सुनेत्रा पवार या महिला म्हणून महाराष्ट्राची आणि त्यांच्या स्वत:च्या बारामती मतदारसंघाची सेवा करतील, याची आम्हा सर्वांना खात्री आहे. याबाबतीत आनंदही आहे. आम्ही कुणालाही सूचना केली नव्हती. फक्त त्यांना माहिती होतं की, ही पोटनिवडणूक आहे. आमच्याकडून रिक्त झालेली जागा आम्हाला भरायची आहे. त्यांना आम्ही सांगून आज नामांकन अर्ज भरलं आहे. नामांकन अर्ज भरण्यासाठी आम्ही कुणालाही निमंत्रण दिलं नव्हतं”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

“छगन भुजबळ अजिबात नाराज नाहीत. या सगळ्या बातम्या कुठून येतात, कोण पसरवतं? कुणी टेबल न्यूज तयार करतं की, भाजप दुसऱ्या पक्षासोबतची म्हणजे आमच्या पक्षासोबतची युती मोडू इच्छित आहे. या सगळ्या टेबल न्यूज तयार करुन आता बंद झालं पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे, दररोजल टेबल न्यूज चालू असते. कुणी सकाळी भोंगा वाजवतं, कुणी दुसरं काही पिलू सोडून देतं, त्यावर आम्ही उत्तर देत बसायचं? अजिबात काही प्रोब्लेम नाही. सगळं व्यवस्थित आहे. आमच्या उमेदवाराचा फॉर्म आम्ही भरलेला आहे. त्याबद्दल काही विषय नाही. कुणाच्या नाराजीचा प्रश्न सुद्धा नाही. आमच्या तीनही पक्षांमध्ये समन्वय असल्यामुळे आम्ही आज त्यांना सांगून अर्ज भरला आहे”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

‘खूप विचार-विनिमय करुन सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून निवड’

“आम्ही खूप विचार विनिमय करुन सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून निवड केली. आम्ही आमच्या निर्णयाची मित्रपक्षांनादेखील माहिती दिली”, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी मांडली. “इच्छा असणं काही चुकीचं नाही. आमचे छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी काहीही सूचना केली. सगळ्यांनी बसून एकमताने निर्णय घेतला. भुजबळ काय बोलले ते मी देखील बघितलं. त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

“ती आरएसएसची बातमी नाही. कुणी व्यक्तीचा, त्यांचा विचार वृत्तपत्रात दिला असेल, त्याचा अर्थ असा नाही की, ती भाजपची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने काही सांगितलं त्यावर आम्ही बोलणं ही चुकीची प्रथा आता सुरु झाली आहे. असे बिनबुडाचे प्रश्न निर्माण करु नका”, असं प्रफुल्ल पटेल म्हणावे.

प्रफुल्ल पटेल यांचा मविआवर निशाणा

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका केली. “महाविकास आघाडीत किती मतभेद होते, आहेत आणि राहतील ते आगामी काळात तुम्हाला बघायला मिळतील. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातील वातावरणाचा त्यांना फायदा झाला. आमच्याकडून युतीच्या राजकारणात जो बदल हवा होता तो आता करुन घेऊ. विधानसभेचं चित्र वेगळं असेल. थोडंफार यश मिळालं याचा अर्थ असा नाही की झाडावर चढावं आणि दुनिया जिंकली”, अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.