चुकीचं घडतंय, ना चर्चा ना संवाद अन् आम्हाला त्याबद्दल अचानक समजलं, शरद पवारांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट
राज्यातील आणि देशातील आणि जगातील अस्थिरतेबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मार्मिक भाष्य केले आहे. पुणे येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

एकीकडे राज्यात पुरस्थितीने शेतकरी कोलमडला आहे. त्यातच जगात आणि शेजारील राष्ट्रात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सध्याच्या स्थितीवर मार्मिक भाष्य केले आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर आपले मत मांडले आहेत.
पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल सेंटरचं उदघाट्न होत आहे याबद्दल प्रतिक्रीया देताना शरद पवार म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल सेंटरचं उदघाट्न होतंय ह्याचा मला आनंद आहे, आणि हे पुण्यात होत आहे हे महत्वाचं आहे. हे सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांवर चर्चा आणि विनिमय करणारं सेंटर अशी आशा आहे.
जयदेव गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे असेही शरद पवार यावेळी म्हणाले. आज काही चुकीच्या प्रथा घडतायत, संसदीय आधार घेऊन यावर भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. हा देश एकसंघ ठेवण्यासाठी संविधान उपयोगी पडतं आहे. आज आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये अस्थिरता आहे, श्रीलंकामध्येही अशा गोष्टी सातत्याने होत आहेत. भारताच्या आसपासच्या देशात अस्थिरता आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
बाबासाहेब म्हटलं की संविधानाचा उल्लेख होतो.देशाच्या संसदेचे काही नियम असतात..पण आजचे राज्यकर्ते सुसंवाद विसरत चालले आहेत असं वाटतं..हे खेदाने नमूद करावे लागत आहे. संसदेत आम्हाला एक दिवशी अचानक समजलं नवीन वास्तू होतेय.. ना चर्चा केली, ना संवाद.. कुणी निर्णय घेतला?.. कशासाठी घेतला यावर चर्चा झाली नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.आज आव्हानं अनेक आहेत.. आता त्याच्या खोलात मी जाऊ इच्चीत नाही असे म्हणत शरद पवार यांनी नवीन संसद भवनावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
निवृत्तीवर भूमिका
नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी त्यांच्या निवृत्तीवरुन देशात चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात अलिकडे आरएसएसचे सरसंचालक मोहन भागवत यांनी देखील भाष्य केले होते. त्यावरुन चर्चा सुरु असताना शरद पवार यांनीही भाष्य केले होते. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबद्दल बोलताना आपले परखड मत मांडले होते. ते यावेळी म्हणाले होते मी स्वत:च या वयात काम करत आहे तर मला यावर प्रतिक्रीया देण्याचा काय अधिकार असा सवाल पवार यांनी केला होता.
