सिंगल स्क्रीन थिएटर चालक आर्थिक अडचणीत, मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, सुप्रिया सुळेंचे ट्वीट

आता सुप्रिया सुळे यांनी राज्यातील एक पडदा थिएटर सुरु करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली (Supriya Sule demand to open Single Screen Theater) आहे.

सिंगल स्क्रीन थिएटर चालक आर्थिक अडचणीत, मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, सुप्रिया सुळेंचे ट्वीट
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 3:58 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी जिम सुरु करा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी राज्यातील एक पडदा थिएटर सुरु करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी सुप्रिया सुळेंना एक निवदेनं दिलं आहे. तेच पत्र ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे. (Supriya Sule demand to open Single Screen Theater)

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत. यामुळे राज्यातील एकपडदा थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करावीत या मागणीचे निवेदन सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी दिले आहे.”

यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री आपणास नम्र विनंती आहे की,कृपया एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, असे ट्विट त्यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. तेच पत्र ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जिम उघडण्याची मागणी केली आहे.

जिम सुरु करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे”, असं सुप्रिया सुळे ट्विटरवर म्हणाल्या होत्या.

याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी “जिम ओपन करा, बघू काय होतं” असा सल्ला दिला होता.

राज ठाकरे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. “आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे”, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले होते. (Supriya Sule demand to open Single Screen Theater)

संबंधित बातम्या : 

जिम सुरु करा, राज ठाकरे-फडणवीसांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांची मागणी

Gym Guidelines | येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, एसीचे तापमानही निश्चित, जिम-योगा सेंटरसाठी केंद्राची नियमावली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.