AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
| Updated on: Mar 04, 2025 | 9:27 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपला राजीनामा दिला. राज्यपालांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.  दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर  राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीला अजित पवार गटातील सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे. धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्यानं ते या बैठकीला उपस्थित नसल्याचं समोर आलं आहे. मात्र छगन भुजबळ हे या बैठकीला का उपस्थित नाहीत, याच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव समोर येत आहे. मात्र आजच्या या बैठकीला भुजबळच उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा 

संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीनं दोन दिवसांपूर्वीच चार्ज सीट दाखल केलं होतं. वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचं सीआयडीनं आपल्या तपासात म्हटलं होतं. संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्यानं त्यांची हत्या करण्यात आली असं या चार्ज शीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर राजीनामा देण्यासाठी धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यातच आता सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.  अखेर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?