AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला पण… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीच चूक केली; मोठी माहिती समोर!

Prashant Kishor NCP : राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या सूचनांवर पक्षाकडून अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,

प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला पण... राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीच चूक केली; मोठी माहिती समोर!
Prashant Kishor NCPImage Credit source: Google
| Updated on: Aug 31, 2026 | 5:00 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात रणनीती आखण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीसमोर आगामी काळातील पक्षाची राजकीय वाटचाल कशी असावी, यासंदर्भात सादरीकरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, यापूर्वी प्रशांत किशोर यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या सूचनांवर पक्षाकडून अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्यानेही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रशांत किशोर यांच्या सूचनांचे पालन नाही

समोर आलेल्या माहितीनुसार, मागील कोअर कमिटीच्या बैठकीतही प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पक्षाची संघटनात्मक रचना, नेतृत्व आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात या सूचना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सूचनांपैकी कोणत्याही सूचनेची अपेक्षित पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने प्रशांत किशोर यांच्या टीमसमोरच पक्षासाठी रणनीतीचे काम नेमक्या कोणत्या दिशेने पुढे न्यावे, असा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीत मतभेद?

विशेष म्हणजे, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह इतर काही प्रमुख पदांवर बदल करण्यात यावेत, अशी सूचना प्रशांत किशोर यांच्या टीमकडून करण्यात आल्याचे समोर आले होती. मात्र, ही सूचना कोअर कमिटीने मान्य केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वातील बदल आणि संघटनात्मक पुनर्रचनेच्या मुद्द्यावर मतभेद असल्याचे बोलले जात आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवणे आणि योग्य राजकीय रणनीती आखणे यासाठी प्रशांत किशोर यांच्या टीमची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, रणनीतीकारांकडून करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणीच होत नसेल, तर पुढील रणनीती निश्चित करण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते.

प्रशांत किशोर यांच्याकडून पुन्हा सूचना

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या टीमने नुकतेच कोअर कमिटीसमोर केलेले सादरीकरण आणि त्यामध्ये मांडलेल्या सूचनांवर पक्षाकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नेतृत्वबदलाच्या सूचनेवर पक्षाची भूमिका काय राहणार आणि आगामी काळात प्रशांत किशोर यांच्या टीमच्या रणनीतीनुसार पक्ष प्रत्यक्षात किती बदल करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!