AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश
राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 4:37 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, मात्र हे यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यात महायुतीचं सरकार आलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे . ही पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान  महाविकास आघाडीसमोर आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला आणि  राष्ट्रवादी शरद पवार गटला बसला आहे. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

एकीकडे काही दिवसांपूर्वी राज्यात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.  माजी राज्य मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विनायकराव जाधव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.  दरम्यान विनायकराव जाधव यांच्यासोबतच  बीआरएसचे माजी आमदार  शंकर अण्णा धोंडगे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिंदे काय म्हणाले?  

शिवसेना चांदा ते बांधा पर्यंत पोहचली आहे. आपल्याला संघटना मजबूत करायची आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे.  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, पीक विमा , ज्येष्ठांसाठी योजना अशा अनेक योजना आपण आणल्या. जे बोलतो ते करतो, त्यामुळे लोक विश्वास ठेवतात. कोनीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहील,  घर तिथे शिवसैनिक अभियान राबवा,  एसआयआर यादीकडे लक्ष द्या,  शिवसेनेत जो काम करेल तोच पुढे जाईल, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  दरम्यान दुसरीकडे आतापासूनच शिवसेनेकडून आगामी निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच