AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? आणखी 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

rohit pawar news : राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील दोन सत्ताधारी पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? आणखी 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
| Updated on: Jun 27, 2026 | 10:26 AM
Share

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत, ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. भविष्यात राज्यातील दोन पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील खासदार फुटून भाजपमध्ये जातील, असा दावा त्यांनी केलाय. रोहित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी सध्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. या कर्जमाफीसाठी रोहित पवार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. राज्य आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘आताच्या घडीला उद्धव ठाकरेंची अडचण नसून एकनाथ शिंदे यांची आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज आहे. त्यात तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंचे खासदार धरलेले आहेत. त्यांना आणखी खासदार फोडायचे आहेत’.

‘भाजपला आकडा पाहिजे. सध्या खासदारांना किंमत आहे. परंतु मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होणार नाही, जर चुकून विधेयक पास झाल्यास सर्व खासदारांची किंमत शून्य होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘एकला चलो रे’ नारा दिला होता. महाराष्ट्रात एका बाजुला एकनाथ शिंदे आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा पक्ष आहे. ‘एकला चलो रे’चा नारा असेल, तर २०२९ च्या निवडणुकीआधी दोन्ही पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील. आता भाजपचे शिंदेंवरील प्रेम हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आहे. महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे. हा सर्व वेळ निघून गेला तर दोन्ही पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील, असा दावा रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांच्या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत