AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट, राजकारणात नेमकं चाललंय तरी काय?

राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची चर्चा सुरु असताना आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट, राजकारणात नेमकं चाललंय तरी काय?
Tatkare and FadnavisImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 18, 2026 | 10:55 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची चर्चा सुरु असताना आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार पार्थ पवार यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती, त्यामुळे आता या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुनील तटकरे यांनी घेतली फडणवीसांची भेट

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती समजू शकलेली नाही. दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती, त्यानंतर आता तटकरेही फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने राष्ट्रवातीत नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पक्षात अंतर्गत मतभेद?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचीही माहिती समोर आली आहे. राष्ट्र्वादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले होते. सुनील तटकरे यांच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष पदाचा तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कार्यध्यक्ष असा उल्लेख नव्हता. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर पक्षाकडून सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते राहणार आहेत. प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत आणि कायम राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली होती.

पक्षात सर्वकाही आलबेल

राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी याबाबत बोलताना म्हटले होते की, राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी सांगतो की, कोणतीही चलबिचल कोणतीही नाराजी नाही. अशा बातम्या काही लोक जाणीवपूर्वक पसरवत आहेत. सुनेत्रा पवार वहिणी साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनिल तटकरे साहेब हे पक्षाचे नेते आहेत. ज्या माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत त्या पेरल्या जात आहेत. ज्या बातम्या दाखवल्या जात आहे त्या सर्व निराधार आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?