AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? एका शब्दात उत्तर देत म्हटले मी..

शिवसेना शिंदे गटाकडून नुकताच विधान परिषदेच्या उपसभापतीच्या नावाची घोषणा करण्यात आली. थेट सर्वांना मोठा धक्का देत शिवसेना शिंदे गटाकडून सचिन आहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावर आता पहिली प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांची आलीये.

सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? एका शब्दात उत्तर देत म्हटले मी..
Sachin Aher and Neelam Gorhe
| Updated on: Jun 30, 2026 | 1:20 PM
Share

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीमध्ये उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या उमेदवारीसाठी जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. सलग दुसऱ्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला. सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. 6 खासदारांसोबतच आता सचिन आहिर देखील शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. एका मागून एक धक्के शिंदे गटाने ठाकरेंना दिली. अजूनही राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे दिसतंय. त्यामध्येच आता थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर झाली.

विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू होती. निलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाकडून सचिन आहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावर आता निलम गोऱ्हे यांची पहिली प्रतिक्रिया आली.

निलम गोऱ्हे यांनी म्हटले की, मी नाराज नाहीये. सचि आहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरला आहे… मी नाराज नाहीये. भाजपाच्या नाराजीचा उपसभापती निलम गोऱ्हे यांना फटका बसला का? असाही प्रश्न यादरम्यान उपस्थित होतो. सातारा झेडपी निवडणूक घडामोडींमुळे गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा आहे. सातारा एसपीच्या निलंबन आदेशामुळे गोऱ्हेंनी नाराजी ओढवली होती.

त्याचा हा फटका असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी नाराज नाहीये. निलम गोऱ्हे यांनी यावर फार काही बोलणे टाळले आहे. आता निलम गोऱ्हे यांच्यावर नवीन कोणती जबाबदारी पक्षाकडून दिली जाते, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा