AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉक टेस्टमध्ये 100 गुण, पुणे दौऱ्यानंतर थेट…; नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडमध्ये, त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय घडलं?

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेड आणि नाशिकपर्यंत पोहोचले असून सीबीआयने संशयितांच्या घरावर छापे टाकत ८ तास कसून चौकशी केली आहे आणि महत्त्वपूर्ण पुरावे जप्त केले आहेत.

मॉक टेस्टमध्ये 100 गुण, पुणे दौऱ्यानंतर थेट...; नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडमध्ये, त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय घडलं?
NEET UG 2026 Paper leak
| Updated on: May 17, 2026 | 7:49 AM
Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील नांदेडपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने (CBI) कडक कारवाई केली आहे. नांदेडमध्ये एका संशयित कुटुंबाची तब्बल ८ तास झाडाझडती घेण्यात आली. तर नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून महत्त्वपूर्ण डिजीटल पुरावे आणि बँक पासबुक जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची कसून चौकशी केल्यानंतर आता सीबीआयचे पथक थेट नांदेडमध्ये दाखल झाले. शनिवारी सीबीआयच्या या पथकाने नांदेड शहरातील विद्युतनगर भागातील कदम नावाच्या एका व्यक्तीच्या फ्लॅटवर छापा टाकला. कदम यांच्या निवासस्थानी सीबीआय अधिकाऱ्यांनी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली. तसेच त्यांच्या फ्लॅटचीही झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांनी आपल्या मुलीसाठी ५ लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र, या कारवाईत नांदेडमधून सध्या तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

चौकशीचे मुख्य कारण काय?

सदर विद्यार्थिनी नांदेडमध्ये परीक्षेची तयारी करत असताना तिला मॉक टेस्टमध्ये केवळ १०० ते १२० गुण मिळत होते. मात्र, पेपर फुटीसंदर्भात लिंक लागल्यानंतर ही विद्यार्थिनी आणि तिची आई अचानक १५ दिवसांसाठी पुण्याला गेले होते. त्यानंतर झालेल्या मुख्य नीट परीक्षेत या विद्यार्थिनीला थेट ५६० गुण मिळाले. गुणांमधील हा अवाढव्य फरक संशयास्पद वाटल्याने सीबीआयने थेट तिच्या घरी धडक देत चौकशी सुरू केली.

तर दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून अटक करण्यात आलेला आरोपी शुभम खैरनार याच्याभोवती सीबीआयने फास आवळला आहे. शुभमच्या चौकशीतून आता या प्रकरणातील मोठ्या आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी सीबीआयने कारवाई करत शुभमचा मोबाईल, लॅपटॉप तसेच नांदगाव येथील घर आणि फ्लॅटमधून बँक पासबुक, पैशांच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि काही महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. या गैरव्यवहारात पैशांची देवाणघेवाण कशी झाली आणि शुभमचे इतर आरोपींशी काय संबंध आहेत, या दिशेने सीबीआयने आपला तपास अधिक तीव्र केला आहे.

Follow Us
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा