AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG 2026 Paper Leak Case: कुंपणानेच शेत खाल्ले, नीट पेपर फुटी प्रकरणात प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक

नीट युजी २०२६ पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने कारवाई करत आता बायोलॉजीच्या प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक केली आहे. त्याच्या आधी सीबीआयने मनिषा वाघमारे यांना अटक केली होती.

NEET UG 2026 Paper Leak Case: कुंपणानेच शेत खाल्ले, नीट पेपर फुटी प्रकरणात प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक
Manisha Mandhare
| Updated on: May 16, 2026 | 7:57 PM
Share

NEET Paper Leak Case: नीट यूजी 2026 पेपर फूटी प्रकरणात आता सीबीआयला आणखी यश मिळाले आहे. सीबीआयने आता या प्रकरणात बायोलॉजीच्या प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे यांच्या अटकेनंतर आता ही दुसरी मोठी कारवाई म्हटली जात आहे. सीबीआयच्या सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे. या प्रकरणात आता अटक झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. नीट पेपर फूट प्रकरणाचे धागेदोरे आता प्रोफेसर आणि कोचिंग सेंटरशी जोडले जात असल्याचे उघड झाले आहे.

कुंपणानेच शेत खाल्ले

या प्रकरणात अटक केल्या मनिषा वाघमारे यांच्या चौकशीतून मनिषा मांढरे यांचे नाव समोर आले. मनिषा वाघमारे यांना सीबीआयने १४ मे रोजी अटक केली होती. जेव्हा तपासाची व्याप्ती वाढली तसे मनिषा मांढरे याचे नाव समोर आली. दोघींचा या प्रकरणात मोठा रोल आहे. सीबीआय आता मनिषा अंधारे यांच्या बँक खात्यांची आणि फोन कॉल्सचे डिटेल्स शोधून काढत आहेत. मनिषा गुरुनाथ मांढरे या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवासी आहेत. त्या सिनियर बॉटनी प्राध्यापक आहेत. त्यांनी एनटीएच्या वतीने नीट-यूजी 2026 परीक्षा प्रक्रियेत एक एक्सपर्ट म्हणून अधिकृतपणे सामील होत्या. एनटीए एक्सपर्ट पॅनलमध्ये असल्याने त्यांनी बॉटनी आणि झुलॉजीच्या प्रश्न पत्रिका सहज मिळाल्या.

सीबीआयने या संपूर्ण रॅकेटचे कथित मास्टरमाईंट पी.व्ही.कुलकर्णी यांना लातूर येथून अटक केली. कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत. ते अनेक वर्षे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. त्यामुळे त्यांना प्रश्न पत्रिका सहज मिळणे शक्य होते. कुलकर्णी यांनी या ओळखीचा गैरवापर केला आणि संपूर्ण पेपर लीक केला.

पुण्यातील ट्युशन क्लासमध्ये रॅकेट

कुलकर्णी याने महाराष्ट्रातील पुणे येथील आपल्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोचिंग क्लास सुरु केले होते. या क्लासच्या विद्यार्थ्यांना त्यांनी संभाव्य प्रश्न, त्याचे पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितली होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोटबुकमध्ये ती लिहीली होती. विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्नच आणि उत्तरे ३ मे रोजी आयोजित परीक्षेत तसेच्या तसे आले.

लातूर येथे पालकांची तक्रार

या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला तेव्हा लातूर येथील काही पालकांनी तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की एका कोचिंग संस्थेच्या मॉक टेस्टमध्ये विचारलेल्या ४२ प्रश्न नीट परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत आले होते. यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवण्यात आला आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!