AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neet Paper Leak : पुण्यात चौकशी, लातूरमध्ये डेरा, मोटेगावकरला अटक… 42 प्रश्न तंतोतंत आलेच कसे? सीबीआयच्या रडारवर कोण कोण?

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लातूर आणि पुणे पुन्हा चर्चेत आहे. सीबीआयने लातूरमध्ये तळ ठोकला असून पुण्यातही चौकशी केली. प्रा. शिवराज माटेगावकर यांना अटक करण्यात आली असून, 42 प्रश्न तंतोतंत कसे जुळले याचा तपास सीबीआय करत आहे.

Neet Paper Leak : पुण्यात चौकशी, लातूरमध्ये डेरा, मोटेगावकरला अटक... 42 प्रश्न तंतोतंत आलेच कसे? सीबीआयच्या रडारवर कोण कोण?
माटेगावकर ताब्यात
| Updated on: May 18, 2026 | 12:07 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे सध्या लातूर पुन्हा एकदा रडारवर आले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरमध्ये आढळल्याने गेल्या तीन दिवसांपासून लातूरमध्ये सीबीआयने मुक्काम ठोकला आहे. या प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तसेच पुण्यातही सीबीआयच्या कार्यालयात काहीजणांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याशिवाय नांदेड आणि नाशिकमधूनही सीबीआयच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याचं सांगितलं जात आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आरसीसी पॅटर्नचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर यांची रात्रभर चौकशी सुरू होती. त्यानंतर आज पुन्हा सकाळी माटेगावकर यांची चौकशी करण्यात आली. माटेगावकरांची पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयात ही चौकशी सुरू होती. तसेच लातूरच्या आरसीसी क्लासमध्येही गेल्या काही तासांपासून इतरांची ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता सीबीआयने माटेगावकर यांना अटक केली आहे. तसेच माटेगावकरच्या लातूर येथील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

क्लासेस भागात चौकशी

नांदेडनंतर आता लातूरमध्ये पुन्हा खासगी क्लासेसच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. काल सायंकाळी सीबीआयच्या पथकाने क्लासेस एरियात जाऊन चौकशी केली. नीट परीक्षा गैर व्यवहार प्रकरणात लातूरच्या क्लासेस चालकांचा काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे. गेस पेपरमधील 42 प्रश्न तंतोतंत नीट परीक्षेत जुळल्याच्या तक्रारी नंतर क्लासेस भागातही चौकशी सुरू आहे.

नोटीस बजावल्या

लातूरमध्ये सीबीआयने पुन्हा खासगी कोचिंग क्लासेसच्या कार्यालयात चौकशी सुरू केली होती. पीव्ही कुलकर्णी आणि खासगी कोचिंग क्लासेसचा संचालकांचे सबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज पुणे सीबीआय कार्यालयात खासगी कोचिंगच्या संचालकाला नोटीस देत सीबीआयने चौकशीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

मांढरेला कोठडी

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थी संतापले

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुण्यात आज एनएसयूआय मॉडर्न महाविद्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. त्यामुळे महाविद्यालया बाहेरच्या गेटवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे या सीबीआयच्या अटकेत आहेत. त्या याच महाविद्यालयातील प्रोफेसर होत्या. त्यांचा निषेध करण्यासाठीच एनएसयूआय निदर्शने करणार आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?