नवी मुंबईत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीच्या बैठका, भाजपला धक्का बसणार? स्पेशल रिपोर्ट

आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे (New Mumbai Political Happening).

नवी मुंबईत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीच्या बैठका, भाजपला धक्का बसणार? स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 9:14 PM

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे (New Mumbai Political Happening). महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीने भाजपचा पराभव करावा, या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मने वळून त्यांना राष्ट्रवादीत जोडून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या पंधरा दिवसात राष्ट्रवादी पक्षात नेमकं कोण सामील होणार आहे, हे उघड होईल. कारण लवकरच नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस तीनही पक्षाचे नेते एकत्र मिळून मोर्चेबांधनी करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमिल कौशिक यांनी एकत्र निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे (New Mumbai Political Happening).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

महापालिकामध्ये एकहाती सत्ता असलेल्या भाजपचा पराभव करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कळंबोलीच्या तटकरे महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पनवेल महापालिका जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

येत्या काही दिवसात शशिकांत शिंदे, सुनील तटकरे आणि सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळ्यात नवी मुंबई आणि पनवेलमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पत्रकारांना बैठकीत प्रवेश नाही

राष्ट्रवादीच्या नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही. आगामी काळात पक्षात येऊ इच्छितांबाबत किंवा दिग्गज नेत्यांना पक्षात सामील करण्याबाबत काय रणनीती असावी, याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. या बैठकीत चर्चा झालेले विषय सार्वजनिक होऊ नये यासाठी पत्रकारांनादेखील या बैठकीत परवानगी देण्यात आली नव्हती.

शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजन करणे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत मोर्चेबांधनी करणं, राष्ट्रवादीच्या बैठका होणं आणि या बैठकांमध्ये पत्रकारांना प्रवेश नसणं या सर्व घडामोडी पाहता आगामी काळात नवी मुंबई महापालिका निवडणुकीत बऱ्याच आश्चर्यकारक राजकीय घटना समोर येण्याचे संकेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हेही वाचा : ठाणे मनपाच्या अधिकाऱ्याला अनधिकृत फेरीवाल्यांकडून दरमहा 3 कोटींचा हप्ता, काँग्रेसचा गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.