मानलं पवार साहेब, एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

मानलं पवार साहेब, एका दिवसात वर्षभराची उतरून टाकली. एका वाक्यात कान टोचले, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

मानलं पवार साहेब, एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई: स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचं वाक्य गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरून भाजपने शिवसेनेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मानलं पवार साहेब, एका दिवसात वर्षभराची उतरून टाकली. एका वाक्यात कान टोचले, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. (nilesh rane taunt Shiv Sena over Sharad Pawar Statement on Uddhav thackeray)

निलेश राणे यांनी एक खोचक ट्विट करून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानफटीत पण दिली, असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्याआधी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही एक ट्विट करून शिवसेनेची खिल्ली उडवली होती. पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा घ्या घरचा आहेर, ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं ट्विट भातखळकरांनी केलं होतं.

शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पवारांनी सेनेला काढलेल्या चिमट्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी ट्विट करत सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (nilesh rane taunt Shiv Sena over Sharad Pawar Statement on Uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

(nilesh rane taunt Shiv Sena over Sharad Pawar Statement on Uddhav thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *