Nitesh Rane : हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का? नितेश राणेंचा इशारा
Nitesh Rane :"सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावून त्या आडून धमकावत असाल तर चिंता करु नका. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका" असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

“तिसरा डोळा उघडायला लावू नका. आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावले जात आहेत. हिरव्या सापांची वळवळ झालीय. इथे हिंदुत्ववादी सरकार आहे” असं इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. “भोकने वाले कुत्ते काटते नही, ही जी हिंदीत म्हण आहे, याचं उत्तम उदहारण कालची सभा होती. तुम्ही एकाबाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, कायदा-सुव्यवस्था मानतो. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र सरकारने अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर केलं, औरंगाबादच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, ते तुम्हाला मान्य नाही. हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का?. शरीया कानून लागू आहे का?” अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी केली.
“ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ मोठी झाली आहे, ते मूळ रझाकार स्वातंत्र्याच्या विरोधात होते. एमआयएमच्या नावाखाली तुमच्या हिरव्या सापांची वळवळ झाली. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल, तर पुढे सरकार म्हणून सभा व्हायला द्यायच्या का?” याचा विचार करावा लागेल” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
‘आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका’
“सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावून त्या आडून धमकावत असाल तर चिंता करु नका. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
‘आय लव्ह महादेव’
नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी आय लव्ह महादेवची पोस्ट केली होती. त्यावेळी ते बोलले की, “ही भूमी महादेवाची आहे. आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत. हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार? एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई सरळ स्पष्ट आहे, आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव चालणार. मी पाकिस्तान, इस्लामाबाद, कराचीमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेलं नाही. मी आमच्या भारतात हिंदू राष्ट्रात, हिंदुत्ववादी विचारांच्या महाराष्ट्रात बसून आय लव्ह महादेव लिहिलय. त्यात काही चुकीचं नाही” असं नितेश राणे म्हणालेले.
