AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल

Nitesh Rane : राम मंदिरासाठी 1 कोटी आणि एक किलोची चांदीची विट आम्ही दिली असं विधान शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. यावर आता मंत्री नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.

अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल
Nitesh Rane on Shivsena UBTImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 26, 2026 | 8:56 PM
Share

संपूर्ण देशात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या दानाच्या चोरीचे प्रकरण चर्चेत आहे. मंदिरासाठी देणगी म्हणून मिळालेल्या चांदीच्या विटा, हार आणि चरण पादुका गायब झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं होतं. दानपेटीतील चोरीची रक्कम वाढू शकते 1 कोटी आणि एक किलोची चांदीची विट आम्ही दिली. त्यांनी अजूनही आम्हाला पावती दिली नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आता यावर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले नितेश राणे?

मंत्री नितेश राणे हे नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना पहायला मिळतात. आता चांदीच्या विटेबाबत बोलताना राणे यांनी, काय पुरावा आहे? ते देणाऱ्या पैकी नाहीत घेणाऱ्यांपैकी आहेत. दिलेली वीट खरंच दिली होती की फोटो पुरती होती ह्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाकडून काय उत्तर मिळते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राम मंदिरात दान करण्यात आलेल्या 200 किलो चांदीच्या विटांचे काय झाले, याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राम मंदिरातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंशी संबंधित प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू झाल्यानंतर काही देणगीदारांनी त्यांना पावती मिळाली नसल्याचा आरोप केला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार तपासात हे आरोप चुकीचे असल्याचे समोर आले आहे.

राजू मंडवानी यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला होता की, 2021 मध्ये त्यांनी 20-20 किलो वजनाच्या 10 चांदीच्या विटा, म्हणजेच एकूण 200 किलो चांदी, राम मंदिरासाठी चंपत राय यांच्याकडे दान केल्या होत्या. मात्र, त्याची पावती आजपर्यंत मिळाली नाही. या दाव्यानंतर सोशल मीडियावर चांदीच्या विटा चोरीला गेल्याच्या अफवा आणि दिशाभूल करणारे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याची चौकशी झाल्यानंतर हे आरोप चुकीचे असल्याचे समोर आले आहे.

तपासात काय समोर आले?

सूत्रांच्या माहितीनुसार, राजू मंडवानी यांनी दान केलेल्या चांदीच्या विटा वितळवण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेची अधिकृत यादी तयार करण्यात आली असून, त्यावर ट्रस्ट आणि संबंधित महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. या यादीतील पहिल्या पानावर अनुक्रमांक 96 अंतर्गत बॉक्स क्रमांक 10 ते 17 मध्ये संबंधित चांदीच्या विटा वितळवण्यात आल्याची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तपासानुसार या चांदीच्या विटा ट्रस्टच्या ताब्यात सुरक्षित होत्या आणि नियमानुसार वितळवण्यात आल्या. त्यामुळे त्या चोरीला गेल्याचे दावे खोटे असल्याचे समोर आले आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा