संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात

नुसतं तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसतं भाषण म्हणतात. राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि सेना भवन मध्ये फक्त भाषण झालं. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात
नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 5:56 PM

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितश राणे (Nitesh Rane) हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक झाले आहेत. महाराष्ट्रात सहकाराचा एक मोठा इतिहास आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank)दोन तीन टर्म राणे साहेबांच्या ताब्यात आहे. राणे कुटुंबातील पहिला संचालक आज बनला आहे.जिल्ह्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक करणार अशी प्रतिक्रिया यावेळी नितेश राणे यांनी दिली तर संजय राऊतांचा (Sanjay Raut) पुन्हा समाचार घेतला आहे. योग्य माहीती आणि भूमिका समजते म्हणून पत्रकार परिषद महत्वाची असते. नुसतं तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसतं भाषण म्हणतात. राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली आणि सेना भवन मध्ये फक्त भाषण झालं. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राऊतांनी घामाघूम होत भाषण केलं

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला मी पत्रकार परिषद म्हणणार नाही.ते एकतर्फी बोलले.हिंमत असती तर प्रश्न उत्तर घेतली असती,घाम पुसत पुसत केलेलं भाषण होत ते. स्वतः पत्रकार असून पत्रकारांवर अन्याय करत असाल तर स्वतःच्या पेशाशी तुमची निष्ठा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच पोलीस आणि प्रशासन हे आदेशावर चालत.राज्यकर्ते आदेश देतात तसं ते चालतात. सत्ताधारी लोकांची मानसिकता काय याचे प्रतिबिंब पोलीस आणि प्रशासन यामध्ये दिसते.पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही, याला जबाबदार सत्ताधारी आहेत. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राजकारणाची पातळी घसरली 

तसचे राणे साहेबांनी जेव्हा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सभागृहात भांडूनही नंतर विलासराव आणि राणे साहेब एका डब्यात जेवायचे.ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही पण कुठंतरी चुकलं आहोत, मात्र राजकारणाची पतळी घसरली आहे. ती चुकीची आहे. घरात घुसत असताना त्यांची मुलं त्यांचे आईवडील असतात याच भान ठेवून अधिकाऱ्यांनी घरात घुसवायला हवं, असेही ते म्हणाले आहेत. तसेच संतोष परब प्रकरणावेळी जर नितेश राणे आजारी नव्हते तर तुमचे डॉक्टर तसे रिपोर्ट का देत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोर्टात पुरावे देऊन बोला

किरीट सोमय्यांच्या आरोपावर बोलताना,किरीट सोमय्या खरं किंवा खोटं बोलत असतील तर कागदपत्रांनुसार तुम्ही लढा ना.तुम्ही थांबवायचा का प्रयत्न करताय? तिथेच चोरी दिसते.काही दिवसांअगोदर मी वरळीला मच्छीमारांना भेटायला जात होतो. तिथेही शिवसैनिक जमा झाले होते.किरीट सोमय्या,राणे साहेब,नितेश राणे जर खोटं बोलत असतील तर कागदाने त्यांना उघडं करा ना. कोर्टात कागद चालतो तिथे घोषणा चालत नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच अधिश बंगल्याबाबत बोलताना तो कायदेशीर विषय आहे.आम्ही कायद्याने त्याला उत्तर देणार आहोत.आम्ही कुठेही पळून जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मोदींच्या भाषणात अहमदाबाद, गांधीनगरचा उल्लेख, मुंबई हायस्पीड ट्रेनचा मुद्दा पुन्हा तापणार?

अमरावती आयुक्तांवरील शाई फेक प्रकरण, आरोपींच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

सरकार लुटारूंच्या पाठिमागे उभा, कारखानदार, साखर आयुक्त ताटाखालचे मांजर-राजू शेट्टी

Non Stop LIVE Update
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल.
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.