पुण्यात येऊ नये अस वाटतं, एवढ प्रदूषण, जॅम, गडकरी म्हणाले… मनसेकडून तो व्हिडीओ ट्वीट!

Nitin Gadkari : पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढल्याने वाहनेही वाढत असून शहरातील प्रदूषणही वाढले आहे. यावर आता मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे.

पुण्यात येऊ नये अस वाटतं, एवढ प्रदूषण, जॅम, गडकरी म्हणाले... मनसेकडून तो व्हिडीओ ट्वीट!
Gadkari and thackeray
Image Credit source: Google
| Updated on: Aug 19, 2026 | 5:09 PM

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. राज्यासह परराज्यातील नागरिकही पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढल्याने वाहनेही वाढत असून शहरातील प्रदूषणही झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील या परिस्थितीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. यात त्यांनी पुण्यातील समस्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर आता मनसेच्या अधिकृत एक्स हँडलवरून भाष्य करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुणे हाउसफुल झालं आहे…

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी पुण्यातील समस्यांवर भाष्य केले होते. हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी असतानाही पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसगणिक वाढत आहे. पुण्यातील रस्त्यांवरून प्रवास करू वाटत नाही. पुण्यात खूप वायू प्रदूषण, ट्रॅफिक जॅम असला तरीही अनेक लोक पुण्यात येत आहेत. त्यामुळे पुणे आता हाउसफुल झालं आहे. प्रत्येक हॉलची कॅपिसिटी असते ना. सगळ्यांना येऊद्या, हे विश्व आपले घर आहे, असं असलं तरी हॉलची कॅपिसिटी पहावी लागेल ना.’ असं विधान केलं होतं.

मनसेने सोशल मीडिया पोस्ट

नितीन गडकरी यांच्या या विधानावर मनसेकडून भाष्य करण्यात आले आहे. मनसेने म्हटले की, ‘पुणे शहराची पार वाट लागली आहे, इथे यावंसं वाटत नाही. या शहरावर अजून बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे किती आदळणार ? आणि हे शहर हे सगळं कसं पेलवणार?’ पुणे शहराबद्दलची निरीक्षण केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मांडली. या धोक्याची पूर्वसूचना अनेक वर्ष राजसाहेब ठाकरे वेळोवेळी मांडत आहेत. मुंबईची वाट लागायला जेवढी वर्ष लागली त्याच्यापेक्षा कमी काळात पुण्याची वाट लागेल हे राजसाहेब अनेक वर्ष सांगत आहेत.

फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असंच विधान डोंबिवलीबद्दल केलं होतं, आज पुण्याबद्दल करत आहेत. फक्त ही विधानं करताना गेली 10 वर्ष त्यांचा पक्ष राज्यात, 12 वर्ष केंद्रात सत्तेत आहे आणि ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली काय धुडगूस घातला गेला आणि शहरं अजून किती बकाल झाली हे मात्र ते विसरलेत असं दिसतंय. त्याउलट 5 वर्षांच्या काळात राजसाहेबांनी नाशिक शहराचा कायापालट केला आणि शहरं घडवण्याचं त्यांचं पॅशन किती तीव्र आहे हे दाखवून दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us