Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या विलिनीकरणाबाबत महत्वाची अपडेट

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. आता त्या बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. प्रहार नंतर बविआचं शिवसेनेत विलिनीकरण होणार असं बोललं जातय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या विलिनीकरणाबाबत महत्वाची अपडेट
Eknath Shinde- Hitendra Thakur
| Updated on: May 26, 2026 | 12:56 PM

दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण होणार अशा चर्चा सुरु झालेल्या. त्यावर आता महत्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत ठाण्याची जागा शिवसेनेला मिळणार आहे. या जागेवर रवींद्र फाटक यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. एकनाथ शिंदे या संदर्भात अधिकृत घोषणा करतील. त्याचसाठी मतदार म्हणून फाटक विविध पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याच भेटीगाठींचा भाग म्हणून रवींद्र फाटक यांनी बविआचे हितेंद्र ठाकूर यांची देखील दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. ठाण्यात शिवसेना, भाजप दोघांचे मतदार आहेत. ठाण्यातील भाजपचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येतोय. सध्यातरी विलिनीकरणाबाबत कोणतीही बोलणी झालेली नाहीत अशी शिवसेना सूत्रांची माहिती.

ठाकुरांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रहारनंतर बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत सामावून घेणार अशा बातम्या सुरु झालेल्या. ठाणे-पालघर विधानपरिषद जागेवर हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील अशा चर्चा होत्या. पण सध्या तरी विलिनीकरणाची चर्चा नाही हे स्पष्ट झालय.

त्याबद्दल मुख्य नेते एकनाथ शिंदेच बोलू शकतात

“माझ्याकडे महापालिका निवडणुकीत वसई विरार आणि पालघरची जबाबदारी होती. मी पालघर जिल्ह्याचा संपर्कप्रमुख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामागे कोणताही राजकीय अर्थ लावू नये. विलिनीकरण हा मोठा विषय असल्याने त्याबद्दल मुख्य नेते एकनाथ शिंदेच बोलू शकतात” असं रवींद्र फाटक बोलले.

तूर्तास या चर्चांना पूर्णविराम

सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना-बविआ एकत्र येऊ शकतात. त्यात दोघांचा फायदा आहे अशा चर्चा सुरु होत्या. त्यामुळे दोघांची राजकीय ताकद वाढेल. भविष्यात राजकीय यशाच्या शक्यता वाढतील. पण तूर्तास या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपने चांगली मुसंडी मारलीय

विरार, वसई, नालासोपारा, पालघर पट्ट्यात या बहुजन विकास आघाडीची बऱ्यापैकी ताकद आहे. भाजपच्या लाटेत वसई-विरारमध्ये बविआ समोर देखील अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. भाजपने विरार, वसई, नालासोपारा, पालघर या पट्ट्यात चांगलीच मुसंडी मारली आहे

Follow Us