AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत चक्र फिरली, एकनाथ शिंदेंसोबत बडा नेता गुप्त बैठकीला हजर; दिल्लीत काय काय घडलं?

Eknath Shinde Amit Shah Meeting: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर निघून गेले. तसेच या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. दौऱ्यावरुन आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच एक माजी मंत्री देखील असल्याचे समोर आले आहे. आता हा मंत्री कोण होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

एका रात्रीत चक्र फिरली, एकनाथ शिंदेंसोबत बडा नेता गुप्त बैठकीला हजर; दिल्लीत काय काय घडलं?
Amit Shah and Eknath shindeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 26, 2026 | 10:47 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक आणि अतिशय गुप्तता पाळत रविवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या अत्यंत गोपनीय भेटीमुळे आणि शिंदेंनी पाळलेल्या गुप्ततेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत या दौऱ्यावर माजी मंत्री उपस्थित असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

पहिले नकार, मग बोलवणं

अवघ्या चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अधिकृत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु शाह यांच्या व्यग्रतेमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही आणि शिंदेंना माघारी परतावे लागले होते. या न झालेल्या भेटीमुळे शिंदे काहीसे अस्वस्थ होते आणि त्यांनी भेटीसाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या आग्रहानंतर शनिवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्याकडून रविवारी भेटीसाठी येण्याचा निरोप आला. हा निरोप मिळताच शिंदेंनी कोणतीही वेळ न दवडता खाजगी विमानाने तातडीने दिल्ली गाठली.

दिल्लीत अर्धा तास चर्चा

दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत त्यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांतील राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर शिंदे थेट बंगळुरूला गेले व तेथून ठाण्यात परतले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात शिंदेंनी आपला नेहमीचा ताफा आणि अधिकृत सहाय्यकांना दूर ठेवले होते. त्याऐवजी राज्याचे एक माजी मंत्री आणि बडे ‘शिक्षणसम्राट’ या दौऱ्यात त्यांच्यासोबत सावलीसारखे हजर होते. मध्यंतरीच्या काळात या नेत्याचे आणि शिंदेंचे संबंध काहीसे ताणले गेले होते, परंतु सध्या त्यांच्याकडे पक्षात मोठी जबाबदारी आहे. या नेत्याने आपण दिल्लीला गेल्याची कबुली दिली असली, तरी हे केवळ ‘पक्षाचे काम’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे आणि शाह यांच्या या अचानक झालेल्या गोपनीय भेटीने महायुतीसह विरोधी पक्षांच्या गोटातही खळबळ उडवून दिली असून, आगामी काळात राज्यात काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

एकनाथ शिंदे यांची फोनवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. महायुतीत दोन जागा भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या बनल्याची चर्चा सुरु आहे. संभाजी नगरच्या जागा भाजपने घेतल्यास तिथून कांग्रेसमधून आलेले कैलास गौरंट्याल यांना ऊमेदवारी देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्.
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच.
शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट.... भेटीमागचं कारण काय?
शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट.... भेटीमागचं कारण काय?.
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.