AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका आणि इराणने मिळून दिली पाकिस्तानला जोरदार लाथ, थेट बाहेरचा रस्ता, नवा..

इराण आणि अमेरिका युद्धाने जगाचे तीन तेरा वाजण्याची वेळ आली. स्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामध्येच आता एक सकारात्मक गोष्ट पुढे आली. ज्याने जगाने सुटकेचा निश्वास घेतल्याचेही बघायला मिळत आहे.

अमेरिका आणि इराणने मिळून दिली पाकिस्तानला जोरदार लाथ, थेट बाहेरचा रस्ता, नवा..
Pakistan Iran US war
| Updated on: May 26, 2026 | 10:44 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका बसला. कतारची राजधानी दोहामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबद्दल चालचाली सुरू आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, अनेक मुद्द्यांमध्ये सहमती झाली. ज्यामुळे मध्यपूर्वीतील तणाव कमी होऊ शकतो. मध्यपूर्वीत तणाव असल्याने अनेक देश जैरीस आलेत. जर कतारला यश मिळाले तर होर्मुज खाडी पूर्वीसारखी सामान्य होईल. अमेरिकेनेही स्पष्ट केले की, इराणसोबत युद्धविरामाच्या अगदी जवळ आहोत. दोहा येथील इराणच्या प्रतिनिधींमध्ये संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अब्दोलनासेर हेमती यांचा समावेश होता. हे स्पष्ट आहे की तेहरान या चर्चांना खूप गांभीर्याने घेत आहे.

कोणत्याही स्थितीमध्ये होर्मुज खाडी खुली व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेत परमाणु, तेलाची निर्यात यावर चर्चा होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्याकरिता पाकिस्तान पुढे होता. मात्र, पाकिस्तानला यश मिळत नव्हते. शिवाय त्यांनी अमेरिकेचाच गेम केला. ज्याने आता पाकिस्तानला युद्धबंदी करारातून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.

कतारचीच युद्ध थांबवण्याकरिता महत्वाची भूमिका सुरूवातीपासून राहिली. आता थेट कतार मैदानात उतरला आहे. अमेरिकेसोबत कतारचे चांगले संबंध आहेत. मुळात म्हणजे इस्त्रायलला देखील पाकिस्तानची मध्यस्थी अजिबात पटली नव्हती. अल जझीराच्या वृत्तानुसार, आखातात पेरलेले सागरी सुरुंग हटवण्यावरही चर्चा झाली आहे. इराण काही गोष्टींवर मान्य करण्यासही तयार आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरील शुल्क हटवणे आणि अमेरिकेच्या नौदल निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्याचाही विचार सुरू आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास, 30 दिवसांच्या आता होर्मुज खाडी सुरक्षित होऊ शकते. होर्मुज खाडीत भारतीय जहाज मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. होर्मुज खाडी ठप्प आहे. त्यामध्येच अमेरिकेने मोठा हल्ला इराणच्या जहाजांवर रात्री केला. त्यामुळेच होर्मुज खाडीत पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला.

Follow Us
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट