AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मनोज जरांगेंची मोठी मागणी, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आता मनोज जरांगेंची मोठी मागणी, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
dhananjay munde and manoj jarange
| Updated on: Feb 21, 2025 | 3:33 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली, ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली, ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे. एखादी मागणी सांगितली की ते म्हणतात चौकशी करू, त्यांना सत्तेसाठी काही गोष्टी लागल्या तर त्यांची स्पष्ट भूमिका असते, तू आमच्यासोबत येत नाही तर तुला आम्ही जेलमध्ये टाकू अशी यांची भूमिका असते. त्याला वेठीस धरून सरकारच्या बाजुनं घेतलं जातं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे .

पुढे बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात कमीत कमी 200 नावं समोर येतील. गेवराईला आरोपीला रगा पुरवण्यात आल्या. चार्ज सीटमध्ये 100 टक्के छेडछाड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा देण्यात आली नाही. तपास यंत्रणेला मुभा दिली असती तर अर्ध जेल भरलं असतं. धनंजय मुंडे हे देखील याच्यातच आहेत. हे सर्व त्यांचेच लोक आहेत. मग त्यांना का सहआरोपी करण्यात येत नाही, मंत्री आहेत म्हणून का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमचे साखळी उपोषण करणारे आरोपी होतात. जे कॅमेऱ्यामध्ये दिसले ते सहआरोपी होतात. मार आम्ही खाल्ला, डोकं आमचं फुटलं, या प्रकरणात जे पोलीस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना उलट बढती मिळाली असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. खंडणीतून खून झाला, खून करणाऱ्या पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा, सामूहिक कट करणारा मोठा असतो. असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?