AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त नागरीक उतरले रस्त्यावर

रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांना या प्रकरणी काय कारवाई केली? असा थेट जाबच पोलिसांना विचारला आहे.

रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त नागरीक उतरले रस्त्यावर
रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त नागरीक उतरले रस्त्यावर
| Edited By: | Updated on: Aug 26, 2024 | 5:25 PM
Share

महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. कारण मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना सर्सासपणे सुरु आहेत. आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण सातत्याने तशा घटना घडत आहेत. बदलापूरच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलेलं असताना आता रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतप्त नागरीक थेट रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांकडून पोलिसांना जाब विचारला जातोय. तर पोलिसांकडून नागरिकांना शांतपणे कारवाई सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित घटनेनंतर रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयाचं कामकाज बंद पाडण्यात आलं आहे. नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद पाडलं आहे. रत्नागिरीच्या चंपक मैदानमधील ही घटना घडली आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित मुलगी ही नर्सिक कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती घरी येत असताना तिला वाटेत अचानक चक्कर आली. त्यामुळे तिने रिक्षा थांबवली. रिक्षातून उतरल्यानंतर काय झालं हे तिला आठवत नाहीय. तिला जाग आली तेव्हा ती चंपक मैदानावर होती. तिने आपल्या कुटुंबियांना फोन केला. आपल्यावर अत्याचार झाल्याचा संशय तिने व्यक्त केला. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अनेक नागरीक आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचा स्टाफ आक्रमक झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर सामान्य नागरिकदेखील पोलिसांना जाब विचारताना दिसत आहेत. सर्वपक्षीय पदाधिकारी शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आले आहेत.

पोलिसांनी काय सांगितलं?

यावेळी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “पोलीस तीन तासांपासून पाळत ठेवून आहेत. पीडितेचा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नागरिकांना दिली. “सकाळी साडेआठच्या दरम्यानची घटना आहे. पोलिसांनी त्या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपी आहे. त्याला शोधण्यासाठी वेळ लागणार आहे. आम्ही चार पथकांना काम दिलेलं आहे”, अशीदेखील माहिती पोलीस अधिकाऱ्याने नागरिकांना दिली.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.