Laxman Hake : अनपट, कुठल्या टीनपाट माणसासमोर तुम्ही..मनोज जरांगेंच्या मनाला वेदना होतील, असे शब्द लक्ष्मण हाकेंनी वापरले
Laxman Hake : "जरांगे तू पश्चिम महाराष्ट्रात आलाय पण इथलो ओबीसी, भटके यांची संख्या माहिती आहे का? जरांगेला कोण कोण भेटायला गेले याची लिस्ट आम्ही केलीय. गावगाड्यातील ओबीसी एक झाला तर काय होईल ते बघा" असं लक्ष्मण हाके म्हणाले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अत्यंत बोचरी टीका केली आहे. “पश्चिम महाराष्ट्रात येऊन समाजात तेढ निर्माण करायची. ज्या लोकांची गणितं हुकली आहेत, त्यांचा जो काही राजकीय फिडिंग करणारा माणूस आहे, त्या तालावर नाचणार हा माणूस आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच आरक्षण अनपट माणसाच्या आंदोलनाला बळी पडून, झुकून शासनाने संपवलं आहे. रोज एक माणून दोन चार माणसांवर टीका करतोय शिव्या देतोय, एक ब्र शब्द तुम्ही काढत नाही. कुठल्या टीनपाट माणसासमोर झुकलात”अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
“महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपले आहे. मनोज जरांगे यांनी काढलेल्या रॅली म्हणजे जातपडताळणी कार्यालयावार दबाव आणत आहेत. मनोज जरांगे यांची दहशतवादी भाषा आहे. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही किंवा तुमचे मंत्री काहीही बोलायला तयार नाहीत. आत्ता झालेल्या निवडणुकीत सर्व जागी कुणबी मराठा आहेत. उरळी कांचन येथील सर्व जागा कुणबी समाजाने घेतल्या. मुख्यमंत्री म्हणतात आमचा DNA ओबीसी आहे. मग ओबीसी आरक्षण संपले की राहिले ते सांगा?. जरांगे पाटील बावनकुळे असेल किंवा मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीची टीका करत आहे. त्यावर राज्यातील पुरोगामी लोकं कुठे गेले?” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.
EWS आणि SEBC जागा कश्या मिळतात मग इतर जातींचे काय?
“महाराष्ट्राने अत्रे, ठाकरे यांची भाषा बघितली. पण जरांगे सारख्या फाळकूट माणसाने राज्यात जातीद्वेष पसरवला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, ओबीसी नेते जरांगे पाटलाला काहीही बोलत नाहीत” असं लक्ष्मण हाके म्हणाले. “शिक्षक नोकर भरती जागा निघाली पण त्यातील 10 टक्के जागा सुद्धा आरक्षण असलेल्या लोकांना मिळत नाहीत. EWS आणि SEBC जागा कश्या मिळतात मग इतर जातींचे काय?. आज ओबीसी आरक्षण संपले आता राज्यातील ओबीसी नेत्यांनी पुढे आले पाहिजे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.