AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलास घुले प्रकरणात गंभीर आरोप, थेट आमदार सुरेश धस यांना जब्या म्हणत.. ओबीसी नेते आक्रमक..

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात दररोज गंभीर आरोप केली जात आहेत. यादरम्यानच आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी धक्कादायक खुलासे केले. हेच नाही तर त्यांनी यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली.

विलास घुले प्रकरणात गंभीर आरोप, थेट आमदार सुरेश धस यांना जब्या म्हणत.. ओबीसी नेते आक्रमक..
Suresh Dhas and Vilas Ghule Case
| Updated on: Jul 02, 2026 | 1:21 PM
Share

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यान बोलताना त्यांची जिभ घसरली. मनोज जरांगे पाटील यांचा मन्या म्हणून एकेरी उल्लेख तर सुरेश धस यांचाही आष्टीचा जब्या उल्लेख केला. विलास घुले हत्या प्रकरण रफादफा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही यादरम्यान नवनाथ वाघमारे यांनी केला. विलास घुले प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. काही गंभीर आरोपही केली. एसआयटीकडून खासदार पुत्राची चाैकशी देखील करण्यात आली. विलास घुले प्रकरणात मनोज जरांगे यांनी मोठे विधान केले. यादरम्यानच या मुद्द्यात नवनाथ वाघमारे यांनी सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यासह बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल चढवला.

बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल करत जहरी टीका केली. आंतरवालीचा मन्या असं म्हणत जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख केला तर आष्टीचा जब्या असं सुरेश धस यांना म्हणत टीका केली.

विलास घुले हत्या प्रकरण रफादफा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप करत खासदार बजरंग सोनवणे प्रकाश सोळंके सुरेश धस आणि विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवाय एसआयटीमध्ये काहीच सापडलं नाही हे जरांगे यांना कसं काय माहित असाही सवाल नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला.

दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व काही सांगणार असल्यासही वाघमारे यांनी म्हटलं. विलास घुले हत्या प्रकरणानंतर ओबीसी समाज आक्रमक होताना दिसत आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी देखील बाजू मांडताना दिसत आहेत. ओबीसी नेत्यांकडून विलास घुलेला न्याय मिळून देण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...