AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 जुलैला ठाकरे बंधुंची विजयी सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंना सुद्धा देणार निमंत्रण

"ही मराठी एकजूट, महाराष्ट्राची एकजूट राजकीय पक्षांपलीकडची एकजूट आहे. जेव्हा-जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेच्या आधारावर आमच्यावर हल्ले केले, महाराष्ट्र हा अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला" असं संजय राऊत म्हणाले.

5 जुलैला ठाकरे बंधुंची विजयी सभा,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंना सुद्धा देणार निमंत्रण
PM Modi-Amit Shah
| Updated on: Jul 01, 2025 | 10:44 AM
Share

“शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. मला सवय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं की, आहोत आम्ही सगळे. टायगर अभी जिंदा हैं. पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करणार आहोत. त्याचं त्यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत. त्यांनी पहावा विजय दिवसाचा हा सोहळा काय आहे. मराठी भाषेसंदर्भात, हिंदी सक्तीसंदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला, तो महाराष्ट्र द्वेष्टयांवरचा विजय आहे. म्हणून त्यांना जयमहाराष्ट्र केला” असं संजय राऊत आजच्या नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले.

नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही प्रिय म्हटलत. त्यावर राऊत म्हणाले की, “शत्रुला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलय शत्रू हा कधीही तोलामोलाचा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या दुश्मनांशी आम्ही जो काय संघर्ष केला, दुश्मनांना आम्ही दाखवलं महाराष्ट्राची एकजूट काय आहे ते”

‘पापाचा द्वेष करा, पाप्याचा द्वेष करु नका’

“पापाचा द्वेष करा, पाप्याचा द्वेष करु नका असा एक इंग्रजीत सुविचार आहे. जेव्हा-जेव्हा असे दुश्मन महाराष्ट्राचे समोर राहतील, त्यावेळी संघर्ष करायला, शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना, राज ठाकरे, शरद पवार आम्हाला मजा येते. आम्ही लढणार लोक आहोत. त्यांना वाटलं त्यांनी जे घाव घातले त्यामुळे महाराष्ट्रातला कोलडमडून गेला. शिवसेना कोलमडून गेली, अजिबात नाही, आम्ही उभे आहोत, लढणार एकदिवस तुम्हाला घरी पाठवणार” असं संजय राऊत म्हणाले.

शिवतीर्थासाठी अर्ज केलाय

“काल राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उद्ध ठाकरे यांच्याशीही माझी चर्चा झाली. वरळीला डोम सभागृह आहे, तिथे हा सोहळा होईल. शिवसेनेने आधी शिवतीर्थ मिळावं यासाठी अर्ज केलेला. हा अर्ज पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सरकार परवानगी देणार नाही हे आम्हाला माहित आहे. मनसे प्रमुखांनी डोमचा पर्याय सुचवला. आम्ही स्वीकारला सर्वांची काल बैठक झाली. कार्यक्रमाच स्वरुप काय असावं, कसं असावं, किती माणस येतील, यावर चर्चा केली” असं संजय राऊत म्हणाले.

ही मराठी एकजूट, महाराष्ट्राची एकजूट

“पाच जुलैला साधारण 12 ते 12.30 दरम्यान कार्यक्रम होईल. उद्धव आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. याविषयी आता दुमत, शंका असण्याचं कारण नाही. या लढ्यात जे सहभागी झाले ते डावे पक्ष या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. ही मराठी एकजूट, महाराष्ट्राची एकजूट राजकीय पक्षांपलीकडची एकजूट आहे. जेव्हा-जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेच्या आधारावर आमच्यावर हल्ले केले, महाराष्ट्र हा अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला” असं संजय राऊत म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.