कर्नाळा नागरी सगकाही बँकेत एक हजार कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

शेकाप नेते आणि माजी आमदार विवेक पाटील चेअरमन असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 1 हजार कोटींचा घोटाळा (Scam in Karnala sahkari bank) झाला आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (18 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन दिली.

Scam in Karnala sahkari bank, कर्नाळा नागरी सगकाही बँकेत एक हजार कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

नवी मुंबई : शेकाप नेते आणि माजी आमदार विवेक पाटील चेअरमन असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 1 हजार कोटींचा घोटाळा (Scam in Karnala sahkari bank) झाला आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (18 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन दिली. बँकेच्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर आणि अनागोंदी कारभारामुळे बँकेत कोटी रुपयांचा घोटाळा (Scam in Karnala sahkari bank) झाला आहे, असा दावाही सोमय्या यांनी केला.

“कर्नाळा बँकेत शेकापच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बोगस कर्ज खाती तयार केली आहेत. तसेच माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने 512 कोटी रुपये इतका प्रचंड अपहार केला. त्यामुळे या बँकेचे दिवाळे निघाले. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांचे पासपोर्ट जप्त करा असं सांगणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितले.

“रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एक लाख ठेवीदार आणि खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही. मात्र बँकेकडून फक्त आश्वासने, दमदाटी केली जात असल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. अनेक ठेवीदारांचा या धसक्याने मृत्यूही झालेला आहे. अशावेळी बँकेने त्यांना योग्य मार्गदर्शन करुन वेळेवर त्यांचे पैसे देणे क्रमप्राप्त होते”, असं सोमय्या म्हणाले.

“शेकडो ठेवीदारांनी बँकेत फेऱ्या मारल्या मात्र बँकेला त्यांची किंचितही दया आली नाही. उलटपक्षी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेवीदारांची वारंवार फसवणूक केली. बँकेत घोटाळा झाल्यामुळेच त्यांना ठेवीदारांना त्यांचे पैसे देता आले नाहीत. ठेवीदारांनी जेव्हा आमच्याकडे संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली आणि त्या अनुषंगाने आम्ही या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला”, असंही सोमय्या म्हणाले.

“या बँकेतील कर्ज खात्याची चौकशी केलेल्या अहवालात बँकेच्या अधिकाऱ्यांनी 63 कर्ज खात्यातून 512 कोटी 55 लाख रुपये कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी आणि अन्य खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे स्पष्ट केलेले आहे”, असंही सोमय्यांनी सांगितले.

सोमय्या म्हणाले, “कर्नाळा नागरी सहकारी बँक लि., कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी या तीन्ही संस्थाचे अध्यक्ष विवेक पाटील आहेत. एकूण कर्ज 633 कोटी 79 लाख रुपये आहे. सदर कर्जापैकी 81 टक्के कर्ज रक्कम 63 कर्जदारांना दिलेली आहे. बाकी शिल्लक राहिलेल्या कर्ज खात्यांपैकी बहुतांश कर्जखाती बोगस असल्याची शक्यता नाकारता येत नाही.”

“माहे ऑगस्ट 2019 पासून कर्नाळा बँक पदाधिकारी, विवेक पाटील (माजी आमदार) हे ठेवीदारांना फक्त आश्वासन देत आले आहेत. कोणत्याही ठेवीदारास त्यांनी पैसे परत दिलेले नाहीत. चौकशी अहवालावरून बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पाटील आणि बँकेचे संचालक मंडळाने 512 कोटी 55 लाख रुपयांचा अपहार केल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करावे. त्यांच्यावर एमपीआयडी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *