नागपूरचा नवा महापौर, उपमहापौर कोण? निवडणूक ऑनलाईन होणार!

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड आज ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे.

नागपूरचा नवा महापौर, उपमहापौर कोण? निवडणूक ऑनलाईन होणार!

नागपूर: नागपूर महानगरपालिकेत भाजपचं वर्चस्व असल्यानं महापौर आणि उपमहापौर (Mayor and deputy Mayor) हा भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. पण आज महापौर, उपमहापौरांची निवड ऑनलाईन पद्धतीनं (Online election process) होणार असल्यानं सत्ताधाऱ्याचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्या माध्यमातून ही निवडणूक घेतली जाणार आहे. (Online election process for Nagpur Mayor and Deputy Mayor)

नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर विद्यमान महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला. तसंच उपमहापौर मनिषा कोठे यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौरांची निवड आज करण्यात येणार आहे. भाजपकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी मनिषा धावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

काँग्रेसमध्ये गटबाजी

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या गटाकडून मनोज गावंडे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी मंगला गवरे यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या गटाकडून रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी रश्मी धुर्वे यांनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान, आज निवडणुकीपूर्वी दोन्ही गटात काही तडजोड होऊन काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक उमेदवार दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कशी असेल निवडणूक प्रक्रिया?

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी 45 मिनिटे आधी सर्व सदस्यांना लिंक पाठवली जाणार आहे. या सदस्यांना पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावं लागेल. सभेला सुरुवात होण्यापूर्वी 15 मिनिटे आधी सदस्यांना उपस्थिती नोंदवावी लागेल. पीठासीन अधिकाऱ्यांमनी सदस्स्यांचे नाव पुकारल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ हात उंचवावा लागणार आहे. अशापद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

बालेकिल्ल्यात संदीप जोशींचा पराभव

गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला.

संबंधित बातम्या:

जोशी जाणार, तिवारी येणार, नागपुरात भाजपा काय करणार?

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ

Online election process for Nagpur Mayor and Deputy Mayor

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI