AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात भाजपचा महापौर निश्चित, तरीही काँग्रेसकडून दोघांना उमेदवारी

काँग्रेसकडून मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी नागपूर महापौर पदासाठी अर्ज केला आहे.

नागपुरात भाजपचा महापौर निश्चित, तरीही काँग्रेसकडून दोघांना उमेदवारी
Nagpur Municipal Corporation
| Updated on: Dec 31, 2020 | 8:47 AM
Share

नागपूर : नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. नागपूर महापौर निवडणुकीसाठी (Nagpur Mayor Election) काँग्रेसने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. नागपुरात भाजपचा महापौर बसणे निश्चित असतानाही काँग्रेसने दोघांना तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Congress Two candidates for Nagpur Mayor Election)

नागपूरचे मावळते महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्या राजीनाम्यानंतर पुढील महापौराच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नागपूर महापालिकेतील 151 सदस्यांपैकी काँग्रेसचे अवघे 29 नगरसेवक आहेत. तर 108 नगरसेवकांसह भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरात काँग्रेसचा महापौर बसणे अशक्य आहे.

काँग्रेसकडून रिंगणात कोण?

काँग्रेसकडून तरीही मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीची परंपरा पुन्हा एकदा समोर आली आहे. दुसरीकडे भाजपकडून दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) महापौर पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून मनीषा धावडे (Manisha Dhawade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतही संघर्ष

नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा जास्त कालावधी असला, तरीही सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही, तर नागपुरातील सर्व जागा स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी आधीच दिला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी 21 डिसेंबरला पदाचा राजीनामा दिला. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांचा 13 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी 13 महिने संदीप जोशी आणि 13 महिने दयाशंकर तिवारी महापौर राहतील, असं सूत्र ठरलं होतं. (Congress Two candidates for Nagpur Mayor Election)

तेलही गेलं तूपही गेलं

आता संदीप जोशी यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं अशी झाली आहे. जाहीर घोषणा केल्यामुळे त्यांना आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणं जिकीरीचं जाईल. विधानपरिषदेची संधीही गेल्यामुळे नगरसेवकपदाचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी थेट विधानसभा निवडणुकीचा पर्याय असू शकेल.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास नागपुरात स्वबळावर, राष्ट्रवादीचा इशारा

जोशी जाणार, तिवारी येणार, नागपुरात भाजपा काय करणार?

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

(Congress Two candidates for Nagpur Mayor Election)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.