AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक, 272 पैकी 133 कैदी कोरोनाबाधीत!

उस्मानाबाद कारागृहातील इतक्या मोठ्या प्रमाणात कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडालीय.

उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक, 272 पैकी 133 कैदी कोरोनाबाधीत!
कोरोना चाचणी प्रातिनिधीक फोटो
| Updated on: May 16, 2021 | 9:56 PM
Share

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. उस्मानाबाद जिल्हा कारागृहात आज कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला , जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी 35 तर आज रविवारी 98 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. त्यात 9 महिला कैद्यांचा समावेश आहे . या सर्वांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. कारागृहातील एवढ्या मोठ्या प्रमाणात कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडालीय. कारागृहातील 272 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यातील 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे 49 टक्के कैद्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आलीय. बंदिस्त कारागृहात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता व्यक्त केली जातेय. (50 percent Prisoner’s of Osmanabad District Jail tested Corona positive)

एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील आणि डॉ. सचिन बोडके यांनी दिली. आज 492 नवीन रुग्ण सापडले तर 09 जणांचा कोरोनाने बळी गेलाय. 687 रुग्ण उपचारनंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 5 हजार 687 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनास्थिती –

उस्मानाबाद जिल्ह्यात रॅपिड तपासणीत 273 रुग्ण आणि आरटीपीसीआर चाचणीत 219 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकूण 1 हजार 423 रॅपिड तपासण्या करण्यात आल्या. त्यात 273 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 1 हजार 114 वर पोहोचलीय. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 60 हजार 371 नमुने तपासले त्यापैकी 48 हजार 956 रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 37.90 टक्के आहे. जिल्ह्यात 42 हजार 155 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.22 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.27 टक्के आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहायची झाल्यास आज उस्मानाबाद तालुक्यात आज 196 रुग्ण , तुळजापूर तालुक्यात 70, उमरगा तालुक्यात 20, लोहारा तालुक्यात 30, कळंब तालुक्यात 38, वाशी तालुक्यात 51, भूम तालुक्यात 32, तर परंडा तालुक्यात 55 रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाचा वाढता आलेख पहा –

दिनांक – रुग्ण – मृत्यू

1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू 2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू 3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू 4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू 5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू 6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू 7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू 8 मे – 629 रुग्ण – 11 मृत्यू 9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू 10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू 11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू 12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू 13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू 14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू 15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू 16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू

संबंधित बातम्या :

Cyclone in Mumbai : मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णत: बंद, तौत्के चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय

17 हजार डॉक्टर, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स, देशात पहिल्यांदाच इतकी मोठी ऑनलाईन परिषद

50 percent Prisoner’s of Osmanabad District Jail tested Corona positive

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.