नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतील 3 हजार लाभार्थी बोगस, अधिकाऱ्यांनी प्रताप केल्याचा खासदारांचा आरोप

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतील अनियमिता आणि गैरव्यवहार झाल्याची तक्रार खासदार डॉ. हीना गावित यांनी केली होती. त्यानंतर 69 गावातील लाभार्थ्यांची चौकशी केली असता त्यात 3 हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत, असा दावा त्यांनी केलाय.

नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतील 3 हजार लाभार्थी बोगस, अधिकाऱ्यांनी प्रताप केल्याचा खासदारांचा आरोप
heena gavit

नंदुरबार : जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतील अनियमिता आणि गैरव्यवहार झाल्याची तक्रार खासदार डॉ. हीना गावित यांनी केली होती. त्यानंतर 69 गावातील लाभार्थ्यांची चौकशी केली असता त्यात 3 हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता खासदार डॉ हीना गावित यांनी व्यक्त केली आहे .

3 हजार घरकुले संशयाच्या भोवऱ्यात

नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत अनियमिता आणि बोगस लाभार्थी असल्याचा तक्रारी खासदार डॉ हीना गावित यांनी केल्या होत्या. त्या अंतर्गत 61 ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 69 गावातील 29 हजार लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आली. त्यात 3 हजार 193 घरकुले संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची पूर्ण चौकशी करण्यात येणार

यात 1 हजार 202 लाभार्थ्यांच्या नावात तफावत आहे तर 1991 नावे जुळत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची पूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ हीना गावित यांनी दिली आहे.

कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांवरही आरोप

कोरोना काळात राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला होता तेव्हा भाजपच्या खासदार हिना गावित यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळाली होती. परंतु, नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला हे सर्व इंजेक्शन्स विक्रीसाठी दिली, असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

(3 thousand beneficiaries of Prime Minister’s Housing Scheme in Nandurbar district are bogus MP hina Gawit Allegation)

हे ही वाचा :

जिल्हाधिकाऱ्याने शिवसेना नेत्याच्या खासगी संस्थेला रेमडेसिवीर विक्रीला दिले; हिना गावित यांचा आरोप

उसाने भरलेली गाडी तलावात पडली अन् बैलाचा करूण अंत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI