एकाच बँकेतील 40 लाखांच्या नोटा भिजल्या, लॉकरमध्ये गाळ भरला, चाळीसगावातील पावसाची दाहकता समोर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 4:39 PM

चाळीगावच्या एका बँकेत पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. या बँकेतील थोडी थोडकी नाही तर तब्बल 40 लाख रुपयांची रोकड भिजली आहे. महापुराचे पाणी बँकेत शिरल्याने एव्हढी मोठी रक्कम भिजली.

एकाच बँकेतील 40 लाखांच्या नोटा भिजल्या, लॉकरमध्ये गाळ भरला, चाळीसगावातील पावसाची दाहकता समोर
Chalisgaon Axis Bank
Follow us

जळगाव : गेल्या आठवड्यात तुफान पावसाने जळगाव, चाळीसगाव (Chalisgaon) या परिसराला झोडपून काढलं. मोठ्या पावसाचा फटका चाळीसगाव-औरंगाबाद मार्गावरील कन्नड घाटालाही बसला होता. कन्नड घाटात दरड कोसळल्याने इथली वाहतूक 24 तासांपेक्षा जास्त काळ बंद होती. चाळीगावात तर पावसामुळे घरं, दुकानं पाण्यात गेली होती. या ढगफुटी सदृश्य पावसाची दाहकता त्यावेळी लक्षात आलीच, पण त्याचे ‘आफ्टर इफेक्ट’ही जाणवत आहेत.

चाळीगावच्या एका बँकेत पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. या बँकेतील थोडी थोडकी नाही तर तब्बल 40 लाख रुपयांची रोकड भिजली आहे. महापुराचे पाणी  बँकेत शिरल्याने एव्हढी मोठी रक्कम भिजली. इतकंच नाही तर बँकेतील लॉकरही गाळाने भरला आहे. त्यामुळे लॉकरमधील रक्कम, सोने-नाणे असं सर्व काही भिजलं आहे.

लॉकरमध्ये गाळ

आता बँकेचे वरिष्ठ अधिकारी आल्यावर लॉकर आणि त्यातल्या रोकडची मोजणी होईल त्यानंतर नुकसानीची आणखी आकडेवारी समोर येईल. पावसामुळे बँकेत पाणी शिरलं. त्यामुळे रोख नोटांसह बँकेतील अन्य साहित्यही पावसाने भिजलं आहे. बँकेचे संगणक, खुर्च्या पाण्याखाली होते. त्यामध्येही बिघाड झाला आहे. आता बँकेचे कामकाज पाचोरा इथून चालवलं जात आहे. मात्र पावसामुळे बँकेचे सर्व व्यवहार रखडले आहेत. ग्राहकांना बँकेत पैसे भरणे किंवा काढणे यालाही अडचणी येत आहेत.

चाळीसगाव-कन्नड भागात तुफान पाऊस

जळगावातील चाळीसगावात 31 ऑगस्टला जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे नद्यांना महापूर आला. अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली. तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली. त्यामुळे रातोरात जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठं नुकसान झालं. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.

कन्नड घाटातील ठप्प वाहतूक सुरु

दरम्यान, तुफान पावसाने चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक दुसऱ्या दिवशी सुरळीत करण्यात आली.

संबंधित बातम्या 

Mumbai rains Maharashtra rain Live : मुक्ताईनगर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI