Mumbai rains Maharashtra rain Live : मुक्ताईनगर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Mumbai rains Maharashtra rain Live : मुक्ताईनगर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी
Chalisgaon rain

Mumbai and Maharashtra rain Live :  मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यानुसार मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तर जळगावातील चाळीसगाव, औरंगाबादेतील कन्नड या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Aug 2021 19:41 PM (IST)

  मुक्ताईनगर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

  मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

  शेतकरी राजा सुखावला

  शेतकऱ्यांच्या पिकाला मिळाले जीवनदान

 • 31 Aug 2021 17:13 PM (IST)

  Kannad Ghat : गेल्या 18 तासापासून कन्नड घाटातली वाहतूक ठप्प

  औरंगाबाद धुळे रोडवर रात्री मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात मोठी दरड कोसळली. गेल्या 18 तासापासून कन्नड घाटातली वाहतूक ठप्प आहे. म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर ही दरड कोसळली. या घटनेत ट्रक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला असून, अनेक म्हशींनाही आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता संपूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या पाऊस थांबला असल्याने रस्ता कसा सुरू करता येईल असा प्रयत्न होत आहे. मात्र तरी पुन्हा पाऊस झाल्यास स्थिती बिकट होऊ शकते.

 • 31 Aug 2021 17:10 PM (IST)

  Chalisgaon Rain : चाळीसगावमधील बाजार पेठेचं मोठं नुकसान, रिंगरोडवर अजूनही गुडघाभर पाणी

  डोंगरी नदीच्या पुरामुळे चाळीसगावमधील बाजार पेठेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दुकानामधील साहित्य पूर्णपणे खराब झाला आहे. चाळीसगाव मधील रिंगरोडवर आद्यपही गुडघाभर पाणी आहे.अजूनही आजूबाजूच्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे

 • 31 Aug 2021 15:08 PM (IST)

  Aurangabad Rain : कन्नड घाटात म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरड कोसळली, ड्रायव्हरसह अनेक म्हशींचा मृत्यू

  औरंगाबाद धुळे रोडवर रात्री मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात मोठी दरड कोसळली या दरडीखाली म्हशी घेऊन जाणारा ट्रकवर ही दरड कोसळली या घटनेत ट्रक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला असून या घटनेत अनेक म्हशीना आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर आशा दरड कोसळल्याने रास्ता संपूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या पाऊस थांबला असल्याने रास्ता कसा सुरू करता येईल असा प्रयत्न होत असला तरी पुन्हा पाऊस झाल्यास स्थिती बिकट होऊ शकते.

 • 31 Aug 2021 14:04 PM (IST)

  नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

  – नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

  – हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत वादळी पाऊस सुरु

  – खरिप पिकांना पावसाचा मोठा फायदा

  – शेतकऱ्यांना दिलासादायक पाऊस

 • 31 Aug 2021 14:03 PM (IST)

  सोयगाव तालुक्यातील बानोटी परिसरात नदीत वाहून जाणाऱ्या एक जणाला वाचवले

  औरंगाबाद –

  सोयगाव तालुक्यातील बानोटी परिसरात नदीत वाहून जाणाऱ्या एक जणाला वाचवले

  नदीला आलेला पुरात एक व्यक्ती जात होता वाहून

  धाडस करत दुसऱ्या व्यक्तीने नदीत उडी मारत वाचवले वाहून जाणाऱ्या व्यक्तीला

 • 31 Aug 2021 14:03 PM (IST)

  दहीहंडी हा उत्साहाचा क्षण, वाईटपणा नाईलाजाने घ्यावा लागतोय

  उद्धव ठाकरे –

  – दहीहंडी हा उत्साहाचा क्षण, वाईटपणा नाईलाजाने घ्यावा लागतोय

  – प्राणवायू प्रकल्पाचे ठाण्यात लोकार्पण झाले, अशा लोकप्रतिनिधींचा अभिमान वाटतो

  – रस्त्यावरील अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, चार कोटी वाहनांवर लक्ष ठेवायचे कसे? यासाठी अद्यावत यंत्रणा हवी

  – महाराष्ट्र नंबर एक आहे, याचा सार्थ अभिमान आहे

 • 31 Aug 2021 13:23 PM (IST)

  Nagpur Rain : नागपुरात मुसळाधार पावसाला सुरुवात

  नागपुरात मुसळाधार पावसाला सुरुवात, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत वादळी पाऊस सुरु, खरिप पिकांना पावसाचा मोठा फायदा, शेतकऱ्यांना दिलासादायक पाऊस

 • 31 Aug 2021 13:03 PM (IST)

  Ahmednagar Rain : अहमदनगरला पावसाने झोडपलं, सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ

  अहमदनगर शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. अहमदनगर शहरातील सीना नदीला पूर आला आहे. नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर या गावाला प्रचंड पाऊस झाल्याने तेथील पाणी हे सीना नदीला मिळते, त्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नगर कल्याण रोडवरील पुलावर पाणी साचल्याने तेथील वाहतूक ठप्प आहे. जेऊर येथे एक हातगाडी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली.

 • 31 Aug 2021 12:39 PM (IST)

  Yavatmal Rain बाहेरगावी गेलेले मित्र परतताना दुचाकीवरुन वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला

  यवतमाळ : सोनापूर नाल्याला आलेल्या पुरात दोघे जण गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू, सतीश देठे , बाळू उईके असं वाहून गेलेल्यांची नावे, सतीश यांचा मृतदेह सापडला, हे दोघेही कामानिमित्ताने मोटार सायकलने बाहेरगावी गेले होते. परत येत असताना नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला.

 • 31 Aug 2021 12:37 PM (IST)

  Mumbai rains : नालासोपारा पूर्व आचोले रोड गेला पाण्याखाली

  नालासोपारा पूर्व आचोले रोड गेला पाण्याखाली. वसई विरार नालासोपारा परिसरात सकाळ पासून रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शहरातील सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे.. नालासोपारा पूर्व आचोले रोडवर तर गुडगाभर पाणी साचले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधाराकाना मोठी कसरत करावी लागत आहे. असाच पाऊस आज दिवसभर चालू राहिला तर शहरातील अनेक सकल भागात पाणी साचून परिसर जलमय होण्याची शक्यता आहे

 • 31 Aug 2021 10:28 AM (IST)

  Beed Rain : भरलेल्या नदीवरील पूल वाहून गेला, गेवराईत हाहाकार, तीन गावांचा संपर्क तुटला

  बीड: गेवराई तालुक्यात अनेक नद्यांना पूरपरिस्थिती, भाटसांगवी ते राक्षसभूवन गावांना जोडणारा पूल वाहून गेला, खळेगाव येथील नदी तुडुंब वाहतेय, नदीवरील पूल वाहून गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला, मध्यरात्रीच्या पावसाने गेवराई तालुक्यात हाहाकार

  बीड: शिरूर कासार तालुक्याला पावसाने झोडपले, सिंदफना नदीला पूर, सिद्धेश्वर बंधारा पूर्णपणे भरला, नदीकाठच्या गावांना सातर्कतेचा इशारा, यावर्षी पाहिल्यांदाचा सिद्धेश्वर बंधारा ओव्हरफ्लो

 • 31 Aug 2021 10:24 AM (IST)

  Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा जोर,घनसावंगी, अंबड, जालना, जाफराबादेत जोरदार पाऊस

  जालना जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आसून घनसावंगी अंबड जालना जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे तर अनेक ठकाणी पुलावरून पाणी वाहत आहे.

 • 31 Aug 2021 10:14 AM (IST)

  औरंगाबादेत धरण फुटल्याने 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू

  औरंगाबाद : भिलदारी पाझर तलाव फुटीचा नागद गावाला जबरदस्त फटका, नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू, पुराच्या पाण्यात फसून गाई म्हशींचा मृत्यू, नदीच्या काठावरील गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा झाला मृत्यू, भिलदारी धरण फुटल्यामुळे नदीला आला होता मुसळधार पूर

 • 31 Aug 2021 10:06 AM (IST)

  Aurangabad Paithan Rain पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस

  औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस, गोदावरी नदीवरील हिरडपुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला, बंधाऱ्यातील पाणी कधीही सोडले जाण्याची शक्यता, बंधाऱ्याखालील गावांना सर्तकतेचा दिला इशारा, पाचोड परिसरात अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर, नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे काही गावात पुराचे पाणी शिरले, पाचोड खुर्दसह अनेक गावांचा संपर्क तुटला, तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान

 • 31 Aug 2021 09:58 AM (IST)

  अमरावती शहरातील राजापेठ येथील हॉटेल इंपेरीयाला मध्यरात्री लागली आग

  अमरावती –

  अमरावती शहरातील राजापेठ येथील हॉटेल इंपेरीयाला मध्यरात्री लागली आग

  आगीत नागपूर येथील GTPL विदर्भ प्रमूख दिलीप ठक्कर यांचा श्वास गुदमरून मृत्यू

  भीषण आगीत पाच जण बचावले

  अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रीच तासाभरात आग आणली आटोक्यात

  रात्री 3 वाजताची घटना,राजापेठ पोलिसांनी केली आग विझवण्यासाठी मोठी मदत

  आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

 • 31 Aug 2021 09:54 AM (IST)

  Nagpur Rain and lighting : बकऱ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी परतलाच नाही, वीज पडून शेतकऱ्यासह 5 बकऱ्यांचा मृत्यू

  नागपूर – वीज पडून गुराखी आणि 5 बकऱ्यांचा मृत्यू, हिंगणा तालुक्यातील रायपूर शिवारातील घटना, दलसिंह भाऊ राठोड असे मृत शेतकऱ्याचे नाव, ते नेहमीप्रमाणे रायपूर शिवारात नाग नदीच्या काठावर बकऱ्या चरायला घेऊन गेले होते. पाऊस व विजेचा कडकडाट सुरूच होता,त्या परिसरात वीज पडली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दलसिंह राठोड रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला आहे

 • 31 Aug 2021 09:46 AM (IST)

  Gadchiroli Rain : रात्रभर तुफान पाऊस, त्यात घरावर वीज कोसळली, चौघे गंभीर जखमी

  गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेल्या रंगधामपेठा येथे रात्री वीज पडून चार नागरिक जखमी, सिरोंचा तालुक्यातील अंकिसा भागात काल रात्री मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसादरम्यान राहत्या घरी वीज कोसळल्याने घरात असलेले चार नागरिकही गंभीर रुपाने जखमी झाले. त्यांना अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन, तेलंगाना राज्यात उपचारासाठी पाठविण्यात आला आहे. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे

 • 31 Aug 2021 09:44 AM (IST)

  Palghar Rain : पालघर किनारपट्टीला पावसाने झोडपलं

  येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर आहे.

  पालघर जिल्हा पावसाचा अहवाल दिनांक 30/08/2021 ते 31/08/2021 सकाळी 8.00 पर्यंत

  1) वसई:-86.5मी मी
  2) जव्हार:- 12.00 मी मी
  3) विक्रमगड:-10.00 मी मी
  4) मोखाडा:- 15.40 मी मी
  5) वाडा :- 67.00 मी मी
  6) डहाणू :- 88.92 मी मी
  7) पालघर:-110.50 मी मी
  8) तलासरी :- 38.6 मी मी
  एकूण सरासरी 53.615

 • 31 Aug 2021 09:43 AM (IST)

  Mumbai Rain मुंबईत जोरदार पाऊस, ढगाळ वातावरण

  मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता. हवामान खात्याकडून तीन ते चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त. मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता झाली कमी, ढगाळ वातावरणासहीत जोरदार पावसाला सुरुवात. येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर आहे.

 • 31 Aug 2021 09:38 AM (IST)

  Jalgaon Chalisgaon Rain : चाळीसगावात अतिवृष्टी, शहरात पाणी घुसलं, 6 गावं पाण्याखाली

  जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

  एसडीआरएफची टीम चाळीसगावात पोहोचलं, जळगावात अतिवृष्टी, शहरात पाणी घुसलं, 6 गावं पाण्याखाली. सर्वांनी काळजी घ्यावी, नदीकाठी जाऊ नये असं आवाहन जळगावचे तहसिलदार अमोल मोरे यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

 • 31 Aug 2021 09:36 AM (IST)

  Kannad Ghat : कन्नड घाटात दरड कोसळली

  चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.

 • 31 Aug 2021 09:36 AM (IST)

  Mumbai Rains : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील तीन-चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज

  येत्या तीन ते चार दिवसात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर आहे. बोर्डी, घोलवड , महाराष्ट्रा शेजारील गुजरात मधील उंबरगावमध्येही तुफान पाऊस आहे. बोर्डी उंबरगाव रस्ता बंद, झाला आहे. डहाणू घोलवड बोर्डी भागात मुसळधार पावसाने काही रस्ते गेले पाण्याखाली. गुजरात राज्यातील उंबरगावात ही सखोल भागात पाणी साचले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI