बोलेरो गाडी आणि स्कूलबसमध्ये समोरासमोर टक्कर, काळ आला होता पण…

| Updated on: Mar 20, 2023 | 1:13 PM

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे एक स्कूल बस दुपारच्या सुमारास मुलांना शाळेत घेऊन निघाली. कापसाळ जवळ ही एक बोलेरो गाडी चुकीच्या लेनमध्ये घुसल्याने मोठा अनर्थ झाला.

बोलेरो गाडी आणि स्कूलबसमध्ये समोरासमोर टक्कर, काळ आला होता पण...
बोलेरो गाडी आणि स्कूल बसची समोरासमोर धडक
Image Credit source: TV9
Follow us on

चिपळूण / कृष्णकांत साळगावकर : चुकीच्या दिशेने आलेल्या बोलेरो गाडीने स्कूलबसला धडक दिल्याची घटना चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. बसमधील सर्व 14 विद्यार्थी सुखरुप आहेत. बसला धडक दिल्यानंतर बोलेरो गाडी पलटी झाली. मात्र गाडीचा चालकाला कुठलीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावर कार्य सुरु केले. याप्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बोलेरो गाडी चुकीच्या दिशेने आल्यामुळे अपघात

चिपळूणमधील युनायटेड इंग्लिश स्कूलची स्कूल बस सोमवारी दुपारी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालली होती. यावेळी विदर्भ कोकण बँकेची बोलेरो गाडी कापसाळ येथे चुकीच्या लेनमध्ये घुसली आणि समोरुन येणाऱ्या बसला समोरासमोर धडकली. धडक इतकी जोरदार होती की बोलेरो गाडी पलटी झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. बसमध्ये 14 विद्यार्थी होते. हे सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु

मुंबई गोवा महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामाचा फटका या अपघाताला कारणीभूत ठरला असल्याचं बोलले जात आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली.

हे सुद्धा वाचा

मुंबई गोवा महामार्गावर संत गतीने चालणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामांमुळे वारंवार अपघात होत असतात. या अपघातामुळे महामार्गावरील होणाऱ्या अपघातांमध्ये आणखी एका अपघाताची नोंद झाली आहे.