रस्त्यावरील साचलेल्या पाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, नालासोपाऱ्यात बस अपघातात तरुणाचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला अतिक्रमणामुळे रस्स्त्यावरुन चालणेही कठिण होते. यामुळे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशीच एक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.

रस्त्यावरील साचलेल्या पाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, नालासोपाऱ्यात बस अपघातात तरुणाचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत एक ठार, दोन जखमीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 3:51 PM

नालासोपारा : नालासोपाऱ्यात महामंडळाच्या बस अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. साजिद उर्फ सचिन असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वेकडील रहिवासी आहे. नालासोपारा पूर्व एसटी बस आगारातून बस बाहेर पडताना आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बस आगारातून बस बाहेर येताच काही अंतरावर ही घटना घडली. पायी चालताना बसच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने तरुणाचा चिरडून मृत्यू झाला आहे. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

पाणी अंगावर उडू नये म्हणून सावरण्याच्या प्रयत्नात बसखाली गेला

नालासोपारा पश्चिम बस आगारातून बस बाहेर निघताना निमुळता रस्ता आहे. एका बाजूला टपरी धारकांनी अनधिकृत अतिक्रमण केलेले आहे. तर बस आगारातून बाहेर निघताच बाहेर पाणी साचलेले असते. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात असते. एकही बस किंवा मोठे वाहन जर आले तर बाजूला साचलेले पाणी अंगावर उडू नये यासाठी प्रवाशी, पादचारी बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात. आज सकाळच्या वेळेत बस अपघातात मयत झालेला प्रवाशीही स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात बसच्या पाठीमागील चाकाखाली आला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी

बस आगाराच्या प्रवेशद्वारावरच ज्या अनाधिकृत टपरी, फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्स्त्यावरुन वाहने, माणसांना चालताना अथळा निर्माण होतो. त्यांच्यावर कारवाई करून रस्ता मोठा करावा अशी मागणी ही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.