घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ढिगाऱ्याखाली दबले, चिमुरड्याचा मृत्यू

घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ढिगाऱ्याखाली दबले, चिमुरड्याचा मृत्यू
घर कोसळून अकोल्यात दुर्घटना

शेख रसूल शेख वजीर यांचं पूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं. पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुर्दैवाने त्यांचा 9 वर्षीय धाकटा मुलगा शेख कामरान याचा मृत्यू झाला

गणेश सोनोने

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 10, 2021 | 12:07 PM

अकोला : घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अकोला जिल्हातील बाळापूर शहरातील सतरंजीपुरा येथे ही दुर्दैवी घटना घडली. (Akola House collapsed five member family stuck below 9 years old child dies)

नेमकं काय घडलं

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात राहणारे शेख रसूल आपल्या कुटुंबासमवेत नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास अचानक त्यांचं घर कोसळलं. त्यानंतर संपूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं.

शेजारी मदतीला धावले

घर कोसळल्याचा आवाज ऐकून साजिद इकबाल अब्दुल रशीद हा शेजारी धावत आला. आजूबाजूचे रहिवासी आणि आपल्या दोन भावांना सोबत घेऊन तो तातडीने घटनास्थळी पोहोचला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले.

पाच जण गंभीर, बालकाचा मृत्यू

शेख रसूल शेख वजीर यांचं पूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्या खाली दबलं होतं. कुटुंबातील लोकांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुर्दैवाने त्यांचा 9 वर्षीय धाकटा मुलगा शेख कामरान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कुटुंबीयांना मदतीची मागणी

शेख रसूल शेख वजीर यांची परिस्थिती हलाखीची असून मोलमजुरी करुन ते आपले कुटूंब चालवत होते. अशा परिस्थितीत शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या :

घराची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये गर्भवती महिलेसह सहा वर्षीय चिमुकल्याचा समावेश

सांगलीत पेट्रोलची बाटली टीव्हीवर पडल्याने स्फोट, घराच्या भिंती कोसळून पत्रे उडाले, पती-पत्नी गंभीर

(Akola House collapsed five member family stuck below 9 years old child dies)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें