अमरावतीमध्ये संचारबंदी, कृषी विभागाची सेवा प्रवेशोत्तर परीक्षा अचानक रद्द, हजारो कर्मचारी अडकले
राज्याच्या कृषी विभागात कार्यरत दुय्यम सेवेतील कर्मचाऱ्यांची परीक्षा शनिवार व रविवार असे दोन दिवस होणार होती. त्या साठी राज्यातील नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि लातूर विभागातील जवळपास 1 हजार कर्मचारी अमरावती येथे पोहोचले होते.

अमरावती: राज्याच्या कृषी विभागात कार्यरत दुय्यम सेवेतील कर्मचाऱ्यांची परीक्षा शनिवार व रविवार असे दोन दिवस होणार होती. त्या साठी राज्यातील नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि लातूर विभागातील जवळपास 1 हजार कर्मचारी अमरावती येथे पोहोचले असताना तसेच या परीक्षेचा सकाळच्या सत्रातील पेपर घेण्यात आला. परंतु, दुसरा पेपर देण्यासाठी परीक्षार्थी हॉल मध्ये गेले असता पेपर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
कर्मचारी सैरभैर
अमरावती मध्ये तीन परीक्षा केंद्र होते. या मुळे हे शेकडो कर्मचारी सैर भर झाले. अनेकांनी हजारो रुपये खर्च करून आले, हॉटेलमध्ये , नातेवाईकांकडे उतरले त्याना आता परत जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नाही.अनेक महिला कर्मचारी लहान-लहान मुले घेऊन आले आहेत. त्यांचे ही हाल होत आहेत.
961 परीक्षार्थी अमरावतीमध्ये अडकले
कृषी विभागाच्या दुय्यम सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली होती. अमरावतीमध्ये एकूण 961 परीक्षार्थी दाखल झाले होते. जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोर्शी रोड, अमरावती, जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती आणि शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या तीन केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
अमरावतीमध्ये संचारबंदी, परीक्षार्थी कर्मचारऱ्यांची अडचण
त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये मुस्लीम संघटनेकडून काल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. अमरावतीमधील कालच्या हिसंक घटनेनंतर आज भाजपच्यावतीनं अमरावती बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळी देखील काही हिंसक घटना घडल्या आहेत. अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्यानं करण्यात आल्यानं परीक्षार्थीं कर्मचारी त्यांच्या घरी कसे पोहोचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर बातम्या:
कांद्याची आयात होताच दरात घसरण, सहा महिने साठवणूक करुनही कवडीमोल दर
Video : आधी मुख्यमंत्र्यांवर टीका, मग सोमय्यांना ‘त्या’ वक्तव्याची उपरती!
Amaravati Agriculture department exam cancelled nine hundred students affected due to cancellation of exam
