शेतातील विद्युत तारेला स्पर्श, यवतमाळमध्ये 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता शेताच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात आली होता. त्या तारेला 18 वर्षीय तरुणीचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेतातील विद्युत तारेला स्पर्श, यवतमाळमध्ये 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
विद्युत तारेला 18 वर्षीय तरुणीचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

यवतमाळ : वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता शेताच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात आली होता. त्या तारेला 18 वर्षीय तरुणीचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुमारी रमई परस्ते (18) असे मृत तरुणीचे नाव असून ती मध्यप्रदेशातील खमरिया या गावाची रहिवासी आहे.

मजुरीच्या कामाला म.प्रदेशातून यवतमाळला!

यवतमाळ आणि आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर राज्यातून मजूर बोलावतात. दोन महिन्या पूर्वी मजुरीच्या कामाकरिता कुमारी ही आपल्या परिवारासह बोर्डा येथे आली होती.

शेत पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांकडून शेताच्या कुंपणाला विद्युत करंट

शेतकरी मोठ्या कष्टाने शेतात उत्पादन घेतात मात्र वन्य प्राणी शेतात शिरून पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. त्यामुळे शेत पिकाचे संरक्षण व्हावे या करिता काही शेतकरी शेताच्या कुंपणाला विद्युत करंट लावतात. बोर्डा येथील शेतकरी नितीन ढेंगळे या शेतकऱ्याने वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळावे या करिता शेताच्या कुंपणाला रात्री च्या वेळी विद्युत करंट लावला होता.

तरुणीचा शेतातील विद्युत तारेला स्पर्श, जागीच मृत्यू

पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास कुमारी ही प्रातःविधी करिता ढेंगळे यांच्या शेताकडे गेली होती. वीज प्रवाहित असलेल्या कुंपणाच्या तारेला स्पर्श होताच तिला जबर झटका बसला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही बाब सकाळी उघड होताच शेत मालक नितीन ढेंगळे यांनी वणी पोलिसांना माहिती दिली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

(An 18-year-old girl died on the spot in Yavatmal after touching an electric wire in a Farm)

हे ही वाचा :

साताऱ्याच्या फलटणमध्ये विकेंड लॉकडाऊनचे नियम पायदळी, प्रशासनाची बघ्याची भूमिका

घरची परिस्थिती हालाखीची, त्यात कोरोनाची वक्रदृष्टी, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ

Published On - 10:17 am, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI