ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण

राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजेची थकबाकी वसुली करण्यासंदर्भातील महावितरणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी साखर कारखान्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासंदर्भातील पत्रक काढलं होतं.

ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण
बाळासाहेब पाटील


सातारा (कराड) : राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजेची थकबाकी वसुली करण्यासंदर्भातील महावितरणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी साखर कारखान्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासंदर्भातील पत्रक काढलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बिलातून वीज थकबाकी वसुली केल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला होता. या प्रकरणावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शेतकऱ्यांची वीज बील थकबाकी ऊस बिलातून वसूलीचा निर्णय आधीचाच असल्याचं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे.

बाळासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं त्यांच्या बिलांची वसुली वेळेत होत नाही त्यामुळं एक निर्णय घेतला. महावितरणनं साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करण्यासाठी मदत केल्यास त्यांना काही टक्के लाभ देण्यात येईल असा निर्णय यापूर्वीच घेतला होता. यासंदर्भात साखर आयुक्तांनी आढावा बैठक घेण्याचं म्हटलं. शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास अडचणी येतात. महावितरण वीज बील वसुलीसाठी अनेक निर्णय राबवते त्यापैकीचं हा एक निर्णय असल्याचं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.

साखर आयुक्तांनी कोणत्या कायद्यान्वये आदेश काढला?

साखर आयुक्तांनी असा आदेश कोणत्या कायद्यानुसार दिला आहे हे स्पष्ट करावं, अशा प्रकारचा कायदा कुठंही नाही. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार शेतकऱ्याच्या बिलातून कसलिही कपात करता येत नाही. शेतकऱ्याच्या ऊस बिलातून पीक कर्जाचे हप्ते वजा होतात. पीक कर्ज काढताना शेतकरी बँकेला हमीपत्र लिहून दिलेलं असतं. त्याशिवाय इतर कोणतीही कपात करता येत नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

मी स्वत: साखर आयुक्तांकडे शेतकरी आणि ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदारांचे पैसे कारखान्यांनी थकवले होते. त्यावेळी त्यांना कारखान्यांना पैसे देण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. मात्र, साखर आयुक्तांनी इतर कोणताही आदेश देता येत नसल्याचं सांगितलं होतं. मग, साखर आयुक्तांनी कशा प्रकारे आदेश काढले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

सदाभाऊ खोत यांचा एकरकमी एफआरपीसाठी मोर्चा

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेत्तृत्वात एक रककमी FRP च्या मागणीसाठी उद्या कराड तहसिलदार कार्यालयावर शेतकऱ्यांच्यावतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघणार असून गावोगावी शेतकरी बैठकांचे सत्र सुरु आहे.

इतर बातम्या:

तुम्ही लवंगी फटाका फोडला, मी दिवाळीनंतर फटाक्यांवर फटाके फोडणार; किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

इथे दादागिरी खपवून घेणार नाही, औरंगाबादेत गुंठेवारी कारवाईच्या इशाऱ्यावरून शिवसेना आक्रमक

Balasaheb Patil said Mahadiscom electricity bill cutting from farmers sugarcane bill payment is old

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI