AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापुरात शेती आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान, 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

महापुरात शेतीचे झालेले नुकसान आणि जनावरांचे झालेले हाल सहन न झाल्याने नागठाणे ता. पलूस येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

महापुरात शेती आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान, 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या
निलेश बाळकृष्ण पवार (वय 22) असं या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 05, 2021 | 8:45 AM
Share

सांगली : महापुरात शेतीचे झालेले नुकसान आणि जनावरांचे झालेले हाल सहन न झाल्याने नागठाणे ता. पलूस येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागठाणे येथील गणेशनगर भागात बुधवारी ही घटना घडली.

निलेश बाळकृष्ण पवार (वय 22) असं या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. भिलवडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. महापुरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता इथून पुढचं जीवन कठीण आहे, अशी सल मनात ठेऊन तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

महापुरात शेतीचं आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान

कृष्णा नदीला मागील आठवड्यात महापूर आला आणि या महापुरात निलेशच्या ऊसाच्या शेतीचं आणि जनावरांच्या गोट्याचं फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तो फार नैराश्यात होता. बुधवारी तो जनावरांचा गोठा साफसफाई करण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. काही वेळाने निलेशने याच शेडमध्ये गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी निलेशचे वडील बाळकृष्ण दशरथ पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मोठं कुटुंब, घरची परिस्थिती हालाखीची

निलेशच्या घरात आई वडील लहान भाऊ बहीण चुलते असे मिळून 10 जणांचे मोठं कुटुंब आहे. घरची परिस्थिती फारच गरिबीची आणि हालखीची आहे. लॉकडाऊनच्या काळात निलेशचे वडील गावोगाव फिरुन भाजीपाला विकण्याचे काम करीत होते. जनावरे आणि शेतीवरच या कुटुंबातील सर्वच उदरनिर्वाह करत होते आणि पोट भरत होते. या कुटुंबावर महापूर आल्यामुळे ऊसशेतीचे फार मोठे नुकसान झाले. आकाशवर आभाळ कोसळले होते. पण सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळे निलेश फार निराश होता. शेवटी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत त्याने आपली जीवनयात्रा संपवली.

कर्ता पोरगा गेला, कुटुंबाला धक्का, गावावर शोककळा

या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील घरातील कर्ता मुलगा गेल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चव्हाण आणि पागे करीत आहेत.

(Big Loss Agriculture And livestock Due to maharashtra Flood 22 year Old Farmer Commits Suicide)

हे ही वाचा :

VIDEO | बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली 33 केकची नासाडी, मुंबईतील टोळक्याची हुल्लडबाजी

पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपुरात तरुणाची आत्महत्या, गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट