कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारी व बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक मदत मिळावी म्हणून लोक कलावंतांकडून शासनाला साकडे!

महाराष्ट्र ही लोककलावंतांची भूमी आहे. यामुळे या भूमीत लोककला जपणाऱ्या गोंधळी, वासुदेव यासह अनेक लोककलावंत आपली कला लोकांसमोर सादर करून दैनंदिन पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांकडून दान मिळवत असतात.

कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारी व बेरोजगारीची कुऱ्हाड, आर्थिक मदत मिळावी म्हणून लोक कलावंतांकडून शासनाला साकडे!
Folk Artist
विशाल ठाकूर

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 27, 2021 | 2:35 PM

शिरपूर : ‘खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तुझ्याविना जीव माझा राहीना’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालत आहे. परंतु, या गाण्याप्रमाणेच वयाच्या पंधराव्या वर्षापासून खंडेरायाच्या नावावर लोककलेच्या माध्यमातून दान मागणाऱ्या कलावंताची कोरोनामुळे व सद्य परिस्थितीमुळे मोठी होरपळ होत असून, या साथीच्या आजारामुळे बेरोजगारीचे व उपासमारीचे संकट येऊन ठेपले असल्याची खंत देखील या लोककलावंताने व्यक्त केली आहे.

खंडेराया हेच आमचे दैवत, असे समजून खंडेरायाच्या नावाने दान मागणाऱ्या कलावंतांनाच आता हे गीत म्हणण्याची वेळ आली आहे.

दान करणाऱ्या व्यक्तींनाही कोरोनाचा फटका!

महाराष्ट्र ही लोककलावंतांची भूमी आहे. यामुळे या भूमीत लोककला जपणाऱ्या गोंधळी, वासुदेव यासह अनेक लोककलावंत आपली कला लोकांसमोर सादर करून दैनंदिन पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांकडून दान मिळवत असतात. परंतु, सध्या परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की, या कलावंतांनी सादर केलेल्या कलेनंतर दान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाच्या परिस्थितीचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, त्यांना देखील दान करायला आखडता हात घ्यावा लागत आहे. परिणामी या लोककलावंतांची या कोरोनाने मोठी होरपळ होत आहे.

कुटुंबावर उपासमारीची वेळ

संपूर्ण आयुष्य व कुटुंब चालवण्याची जबाबदारी या कलावंतावर असल्याने त्यांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ या कोरोनामुळे आले आहे. परिस्थिती जर अशीच राहिली तर ही महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या कलावंतांना ही कला बंद करण्याची वेळ या कलावंतावर येऊ शकते.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

दारोदारी फिरून महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या कलावंताची दुष्काळाने होरपळून तर चालले आहे. परंतु, यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी शासनाकडून कसल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने, हे कुटुंब समाजाच्या घटकापासून वंचित राहत असल्याची खंत या कलावंतांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान आर्थिक मदत मिळावी म्हणून लोक कलावंतांनी शासनाला साकडे देखील घातले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 21 हजार 382 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 98 हजार 100 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 44 कोटी 19 लाख 12 हजार 395 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

(Corona causes starvation and unemployment on folk artists asking financial help from government)

हेही वाचा :

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची ‘61 मिनिट्स’ रसिकांच्या भेटीला! घरबसल्या घेता येणार थरारनाट्याच्या अनुभव!

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?132

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें