AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 वर्षीय वृद्ध महिला बसली उपोषणाला; प्रशासनाची अशी उडाली भंबेरी

शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.

80 वर्षीय वृद्ध महिला बसली उपोषणाला; प्रशासनाची अशी उडाली भंबेरी
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 11, 2023 | 1:57 PM
Share

धाराशिव : प्रशासन किती मुर्दाड असते. याचा प्रत्यय आज धाराशिव येथे आला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेची साधी मागणी पूर्ण केली नाही. शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे. महिलेचा आसा आरोप आहे की, शिवबांधावर एमएसईबी आणि संबंधितांनी संगनमत करून राजकीय दबाव निर्माण केला. बेकायदेशीररीत्या रोवलेले लाईटचे पोल काढण्यात आले. गट क्रमांक ७४ ला रस्ता देऊन संबंधित दोषींवर हद्दफोडीचा गुन्हा नोंदवण्यात यावी, अशी यांनी मागणी आहेत. या महिला ८० वर्षीय कलावती काशिनाथ जाधव आहेत.

प्रशासनाची उडाली भंबेरी

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तहसील कार्यालयाकडे अर्ज करूनी शेत रस्ता दिला जात नाही. असा आरोप करीत खुंटेवाडी येथील कलावती जाधव ही 80 वर्षीय वृद्ध महिला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या आहेत. गेल्या बारा वर्षापासून सलग शेत रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ही महिला आमरण उपोषणाला बसली आहे. महिलेने उपोषण सुरू करतात प्रशासनाची ही चांगलीच भंबेरी उडाली होती. उशिरापर्यंत महिलेने उपोषण मागे घ्यावा यासाठी प्रशासनाकडून विनवनी सुरू होती. आतापर्यंत लाईटली घेणारे प्रशासकीय कर्मचारी आता घाबरलेले दिसले. या महिलेचं उपोषणादरम्यान काही बरेवाईट झाल्यास काय होणार, अशी चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळे उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी महिलेला विनवनी करत आहेत.

शासकीय बाबूगिरी

आतापर्यंत त्यांनी प्रशासनाच्या दरबारी चपला झिजवल्या पण, प्रशासन काही नमत नव्हते. राजकीय दबाव काय असतो, हे या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासन आणि प्रतिनिधी सामान्य माणसांची परवड करत असतात. सामान्य लोकांसाठी न्याय मिळत नसल्याची ओरड नेहमी होत असते. हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. सामान्य माणसाला त्रास देण्याचं काम शासकीय बाबूगिरी करत असते.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर