AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडच्या धान्य घोटाळ्याच्या मास्टरमाईंडला ED कडून अटक, अनेक अधिकारी जाळ्यात येण्याची शक्यता

राज्यभरात गाजलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना अटक केलीय. (ED Arrested Ajay Baheti in nanded over PDS Scam)

नांदेडच्या धान्य घोटाळ्याच्या मास्टरमाईंडला ED कडून अटक, अनेक अधिकारी जाळ्यात येण्याची शक्यता
फोटो : ईडी
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 10:19 AM
Share

नांदेड : राज्यभरात गाजलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे (India Mega Agro) संचालक अजय बाहेती (Ajay Baheti) यांना अटक केलीय. काही महिन्यांपूर्वीच बाहेती यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर कंपनीत त्यांनी उत्पादन ही सुरु केले होते. कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी भागात अजय बाहेती यांची इंडिया मेगा ऍग्रो अनाज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत शासकीय धान्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली होती.  (ED Arrested Ajay Baheti in nanded over PDS Scam)

शुक्रवारी ईडीकडून अटक

त्यानंतर मीना यांनी वेगळे पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावला. वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात शासकीय धान्याचे ट्रक इंडिया मेगा कंपनीत जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या संचालक यासह धान्य पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल केले होते. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेती सह अन्य मंडळींची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर बाहेती यांनी परत आपल्या व्यवसायास सुरवात केली होती. परंतु शुक्रवारी ईडीने बाहेती यांना अटक केलीय.

अनेक अधिकारी जाळ्यात सापडणार

बाहेती यांनी जवळपास 3 हजार राशन दुकान आणि 27 गोदाम यांच्या माध्यमातून शासकीय धान्याचा घोळ घातल्याचा आरोप करीत मनी लॉन्डिंगच्या आरोपावरून बाहेती यांना ताब्यात घेतलय. त्यानंतर बाहेती यांना आठ दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. या घोटाळ्यात अनेक शासकीय अधिकारी सहभागी असल्याचे ईडीने नमूद केले आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना याच कंपनीने चुना लावला

बाहेती यांच्या कृष्णुर इथल्या इंडिया मेगा या कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना देखील फसवलंय. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांचे पैसे बुडवून बाहेती महिना भरापासून फरार आहे. आपले पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांनी कंपनीबाहेर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ही केले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता तर धान्य घोटाळ्याचा तपास ED कडे गेल्याने शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील असा प्रश्न निर्माण झालाय. (ED Arrested Ajay Baheti in nanded over PDS Scam)

हे ही वाचा :

ईडीची दिवसभर छापेमारी, नागपूर-मुंबईच्या निवासस्थानी धाडी, अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?

अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेतला, आणखी कारवाईही केली, पोलिसाविरोधात बंड, थेट आत्महत्या

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.